काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांना अटक

काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या दिग्विजय सिंह यांना अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी बंगळुरुला पोहोचले आहेत.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 18 मार्च: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी बंगळुरुला पोहोचले आहेत. मात्र, रमाडा हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व आमदारांना त्यांना भेटता आलं नाही. दिग्विजय सिंह यांना पोलिसांकडून गेटवरच अडवण्यात आलं. त्यावरून आक्रमक झालेले दिग्विजय सिंह आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोरच ठिय्या आंदोलन केलं. नंतर पोलिसांनी दिग्विजय सिंह आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी दिग्विजय सिंह यांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी दिग्विजय सिंह यांच्या सोबत कर्नाटक काँग्रेस प्रमुख डी शिवकुमार होते.

दिग्विजय सिंह यांनी असं केलं ट्वीट...

'मैं बेंगलुरू के रमाडा होटल पहुंच गया हूं. पुलिस हमें रोक रही है.’

दुसरीकडे, मध्‍य प्रदेशचे माजी मुख्‍यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून कमलनाथ सरकारला आव्हान दिलं आहे. फ्लोअर टेस्‍ट लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनवाणी घेत सुप्रीम कोर्टाने मध्‍य प्रदेशातील कमलनाथ सरकार, विधानसभाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाला नोटिस बजावली आहे. याबाबत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी बुधवारी (18 मार्च) सुनावणी होणार आहे.

बंगळुरु येथे मीडियाशी संवाद साधताना दिग्विजय सिंह यांनी सांगितलं की, 'मी मध्य प्रदेश राज्यसभेचा उमेदवार आहे. येत्या 26 मार्च रोजी मतदान होणार आहे. माझे 22 समर्थक आमदार येथे थांबले आहेत. त्यांना सगळ्यांना माझ्याशी बोलायचं आहे. काँग्रेस आमदारांचे फोन हिसकावण्यात आले. पोलिस त्यांना भेटू देत नाही आहेत.

हॉटेल बाहेरच मांडला ठिय्या...

दिग्विजय सिंह यांना कर्नाटक पोलिसांनी अडवताच त्यांनी रमाडा हॉटेलबाहेरच ठिय्या मांडला. यावेळी डी. शिवकुमारही त्यांच्यासोबत होते. 'मी गांधीवादी असून माझ्याकडे बॉम्ब नाही किंवा पिस्तूलही नाही. मला काँग्रेस आमदारांना भेटू द्या. मी परत निघून जाईन,' असं दिग्विजय सिंह यांनी यावेळी सांगितलं.

Tags:
First Published: Mar 18, 2020 10:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading