भोपाळ, 7 नोव्हेंबर : देशभरातील 54 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, ओडिशा, नागालँड, हरियाणा, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होती ती मध्य प्रदेशची. कारण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपचा मुख्यमंत्री करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मध्य प्रदेशमधून भाजपसाठी दिलासादायक बातमी आली आहे. कारण इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार विधानसभेच्या 28 जागांवर झालेल्या पोटनिवणुकीत भाजपला 16 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेस 10 ते 12 जागांवरच थांबेल, असं हा एक्झिट पोल सांगतो. निकालातही अशीच स्थिती राहिल्यास काँग्रेससाठी हा मोठा धक्का असणार आहे.
बिहार निवडणुकीत ट्वीस्ट, तेजस्वी यादव सुसाट
बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यादव की नितीश कुमार याचा निकाल 10 तारखेला लागणार असला तरी एक्झिट पोल्सचा अंदाज आजच स्पष्ट झाला आहे. 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडीही पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे.
'रिपब्लिक जन की बात'चा अंदाज
एकूण जागा – 243
NDA 91-117
MGB/UPA 118-138
LJP 5-8
OTH 3
दुसरीकडे, C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळणार आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
जेडीयू : 70
भाजप : 42
RJD - 85
काँग्रेस 25
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.