• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • तरुणांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी जीवन कौशल्य गरजेचं : विकास महात्मे

तरुणांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी जीवन कौशल्य गरजेचं : विकास महात्मे

राज्यसभेचे शून्य काळात बोलताना डॉक्टर महात्मे यांनी हा विषय मांडला.

  • Share this:
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : देशातील तरुणांचे मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी जीवन कौशल्य शिकविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी सभागृहात केले. राज्यसभेचे शून्य काळात बोलताना डॉक्टर महात्मे यांनी हा विषय मांडला. 'आपण जेव्हा मानसिक आरोग्य म्हणतो तेव्हा प्रत्येकाला 'स्किझोफ्रेनिया, वेडेपणा' सारखे गंभीर मानसिक विकारच मनात येतात.परंतु मानसिक आरोग्य असे मी म्हणतो तेव्हा मला 'मनोबल' अभिप्रेत असते. बरेच तरुण 'Merit' मधे येतात पण त्यांचे ध्येय गाठण्यात असमर्थ असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणे त्यांना जमत नाही. पुस्तकी शिक्षण तर घेतले परंतु मानसिकदृष्ट्या ते बलवान होत नाही. पुस्तकी शिक्षणा व्यतिरिक्त विचार कौशल्ये, भावनिक नियमन करण्याची क्षमता, टीमसोबत काम करण्याची क्षमता इतरांबद्दल सहानुभूती असणे खूप महत्वाचे आहे,' असे डॉक्टर महात्मे यांनी सभागृहात सांगितले. 'तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण आणि Low Frustration Tolerance चिंतेची बाब आहे. आपण संविधानात उल्लेख असणा-या सहिष्णुतेबद्दल बोलतो. यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दूस-या व्यक्तीचे म्हणणे पटले नाही तरी ते आदरपूर्वक ऐकून घेण्याची क्षमता, त्या व्यक्तीचे विचार पटले नाही तरी त्या व्यक्तीचा आदर करण्याची क्षमता याची शिकवण बालपणा पासूनच मिळायला हवी,' असेही डॉक्टर महात्मे म्हणाले. 'गांधीजींनीही नयी तालीम मधे कौशल्य शिक्षण देण्यावर भर दिला होता. WHO - जागतिक आरोग्य संघटनेने ही 10 जीवन कौशल्ये अभ्यासक्रमात अनिवार्य असणे अधोरेखीत केले आहे. ज्याप्रमाणे इतर विषयांसाठी परीक्षा व गुण आहेत त्याचप्रमाणे या विषयाचे देखील मूल्यांकन केले पाहिजे. कारण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही तर सुदृढ मन असणे अत्यावश्यक आहे,' असंही ते म्हणाले.
Published by:Akshay Shitole
First published: