We support CAA and NRC, तरुणाने दिला लग्नपत्रिकेतून संदेश

We support CAA and NRC, तरुणाने दिला लग्नपत्रिकेतून संदेश

त्यांनी आपल्या लग्नपत्रिकेत मोठ्या व ठळक अक्षरात We support CAA and NRC असं लिहिलं आहे

  • Share this:

नरसिंगपूर, 18 जानेवारी : सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन वादंग सुरू असताना मध्य प्रदेशातील नरसिंगपूर भागातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेवरच CAA ला पाठिंबा दर्शविला आहे. प्रभात असं या तरुणाचं  नाव असून आज त्याचा विवाह सोहळा आहे. लोकांमध्ये नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी मी लग्नपत्रिकेवर We support CAA and NRC असा आशय लिहिला आहे, असं प्रभातचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील एका कुटुंबानेदेखील लग्नात नागरिकत्व संशोधन कायद्याविषयी असलेला पाठिंबा विविध माध्य़मातून व्यक्त केला होता. मोहीत मिश्रा आणि सोनम पाठक यांचा विवाह येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यांनी आपल्या लग्नपत्रिकेत मोठ्या व ठळक अक्षरात  We support CAA and NRC असं लिहिलं आहे.

देशात CAA लागू केल्यानंतर विविध भागातील लोकांनी विरोध प्रदर्शन केलं. मात्र ही काही मंडळी लग्नाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लग्न हा सामाजिक सोहळा असतो. यानिमित्ताने हजारो लोकांशी संबंध होतो, ते जोडले जातात. याचा उपयोग करीत देशातील काही तरुण मंडळींनी नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विविध भागातून विरोध केला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. ते म्हणाले, CAA, NRC मुळे देशात भयाच वातावरण आहे. 24 जानेवारीला अर्थव्यवस्थेबाबत केंद्र सरकरने 27 लाख कोटी देश चालवण्यासाठी आवश्यक असं बजेटमध्ये म्हटलं होतं. मात्र आतापर्यंत 11 लाख कोटी जमा झाले आहेत त्यामुळेच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि CAA, NRC विरोधात 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यात विविध कामगार संघटना आणि मुस्लीम संघटना सहभागी होणार आहेत.

First published: January 18, 2020, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading