धक्कादायक! काँग्रेस आमदाराचा राजीनामा मंजूर झाला आणि मुलीने केली आत्महत्या

धक्कादायक! काँग्रेस आमदाराचा राजीनामा मंजूर झाला आणि मुलीने केली आत्महत्या

ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

  • Share this:

भोपाळ, 20 मार्च : मध्य प्रदेशमध्ये मोठं राजकीय नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च (Supreme court) न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ (Kamalnath) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ज्योतिरादित्य यांच्या समर्थक आमदारांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार अडचणीत आलं आहे. मात्र अशातच मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थनार्थ आमदारकीचा राजीनामा दिलेल्या सुरेश धाकड यांची मुलगी ज्योती हिने आपल्या सासरी आत्महत्या केली आहे. धाकड यांचा राजीनामा कालच विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला होता. त्यानंतर आज घडलेल्या या घटनेमुळे मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. मात्र धाकड यांच्या मुलीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणीत

भाजपने दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने आज फ्लोअर टेस्ट (Floor Test) होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना 17 मार्चला फ्लोअर टेस्ट घेऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, विधानसभाध्यक्षांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चला विधानसभेचं कामकाज 26 मार्चपर्यत स्थगित केल्याची घोषणा केली. असं असताना विधानसभेत फ्लोअर टेस्‍टची कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती.

हेही वाचा- भारतात पाचव्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू; एकूण रुग्णांची संख्या 196 वर

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते आणि तातडीने फ्लोअर टेस्टची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता कमलनाथ सरकार बहुमत सिद्ध करू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपप्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार अस्थिर झालं. ज्योतिरादित्य यांच्या समर्थक 22 काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आणि त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा कमलनाथ यांनी केला असला, तरी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

First published: March 20, 2020, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading