भोपाळ, 25 मे : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसनं प्रियांका गांधी यांना देखील सक्रीय राजकारणात उतरवलं. शिवाय, न्याय सारखी योजना देखील जाहीर केली. पण, दोन्ही गोष्टींचा काँग्रेसला फायदा झाल्याचं सध्याच्या आकडेवारीवरून तरी दिसत नाही. उत्तर प्रदेशमध्ये देखील प्रियांका गांधी यांची जादू चालली नाही. पराभवानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रियांका गांधी यांना सक्रीय राजकारणात उशिरा आणण्यात आलं. तसंच न्याय योजना देखील लोकांसमोर ठेवायला उशिर झाला. पराभवानंतर काँग्रेसमध्ये विचारमंथन देखील होताना दिसत आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा देखील सामना करावा लागला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीमधून पराभव स्वीकारावा लागला.
राहुल गांधी देणार राजीनामा?
अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पहिलीच निवडणूक लढवली होती. शिवाय, त्यांना बहिण प्रियांका गांधी यांची देखील साथ मिळाली होती. पण, त्यानंतर देखील काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी ( आज ) होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.
पराभवानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; बैठकीला नेत्यांची दांडी
मुंबईतील बैठकीला नेत्यांची पाठ
पराभवानंतर देखील काँग्रेसमधील मतभेद काही संपताना दिसत नाहीत. पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक दिग्गजांनी पाठ फिरवली. पराभवावर विचारमंथन करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी बैठक बोलावली. या बैठकीला संजय निरूपम, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली होती. तर, एकनाथ गायकवाड हे एकमेव नेते या बैठकीला हजर होते.
पोलिसांची फिल्मी स्टाईलनं दादागिरी, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Priyanka gandhi