Home /News /national /

‘कमलनाथ हे तर कलंकनाथ आणि राक्षस’, ‘आयटम’ वक्तव्यावरून भडकल्या इमरती देवी

‘कमलनाथ हे तर कलंकनाथ आणि राक्षस’, ‘आयटम’ वक्तव्यावरून भडकल्या इमरती देवी

'कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला. मुख्यमंत्री पद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागलं असून ते राज्यभर फिरत आहेत.'

    भोपाळ 19 ऑक्टोबर: मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केलाय. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते अशी टीका त्यांनी केली. एका प्रसार सभेत कलमनाथ यांनी ‘आयटम’ असा उल्लेख केल्याने मध्य प्रदेशात वादळ निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे. इमरती देवी म्हणाल्या, कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला होता. ते मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांना फटकारत असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्री पद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागलं असून ते राज्यभर फिरत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. कमननाथ यांचं स्पष्टीकरण अखेर आज एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी त्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी कोणाचा अपमान केला नाही. ते पुढे म्हणाले की, मी नाव विसरलो होतो. मात्र शिवराज सिंह चौहान निमित्त शोधत आहे. पण कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत नाही. 'मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करू नये', देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात कमलनाथ यांनी एका निवडणूक सभेत म्हणाले की, मी जे काही म्हणालो, तो अपमान नव्हता. मी असं काही ठरवून म्हणालो नव्हतो..मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात येत नव्हतं. ज्याचं नावच लक्षात नाही त्यांना काय म्हणू मी...आज ज्याप्रमाणे आपल्या व्यासपीठावर आयनम नंबर 1 आहेत राजनारायण सिंह, आयटन नंबर 2 अजय सिंहजी...या यादीत आयटन नंबर 1, आयटम नंबर 2..आयटम नंबर 3 असं नावं आहेत. मात्र शिवराज सिंह तर कारण शोधत आहेत. कमलनाथ कधी कोणचा अपमान करीत नाही...मी सत्यासह पोल खोलतो. कमलनाथ पुढे म्हणाले की, तुमच्याजवळ बोलायला काही नाही, म्हणून काहीना काही बोलत असता. तुम्ही म्हणता कमलनाथ कोका कोला पितो..हो मी पितो कोका कोला..जर कोका कोला पिणं बंद केलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबले की तरुणांना रोजगार मिळेल? ही भारतीय जनता पक्षाची स्थिती आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या