मराठी बातम्या /बातम्या /देश /

माजी मंत्र्याच्या बंगल्यात महिलेची आत्महत्या; मॅट्रिमोनियन साइटवरून लग्नाची बोलणी झाल्याच्या चर्चेनं प्रकरणाला वेगळं वळण

माजी मंत्र्याच्या बंगल्यात महिलेची आत्महत्या; मॅट्रिमोनियन साइटवरून लग्नाची बोलणी झाल्याच्या चर्चेनं प्रकरणाला वेगळं वळण

 39 वर्षीय सोनिया भारद्वाजने काँग्रेस आमदाराच्या बंगल्यातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हे माजी मंत्री सोनियाशी लग्न करणार होते, अशा चर्चेने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. काय आहे नेमकं प्रकरण?

भोपाळ, 18 मे  - मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) माजी वनमंत्री (Former Forest Minister) उमंग सिंघार (Umang Singhar) यांच्या भोपाळमधील शहापुरा सेक्टर बीमध्ये असलेल्या बंगल्यात एका महिलेनं (Sonia Bhardwaj Suicide case) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही महिला त्यांची मैत्रीण असल्याची चर्चा आहे. दोघे लग्नही करणार असल्याचं बोललं जात असल्याने प्रकरणाला ट्विस्ट मिळाला आहे.

सोनिया भारद्वाज (Sonia Bhardwaj) असं या महिलेचं नाव असून, ती मूळची हरियाणातील अंबालामधील होती. ती बलदेव नगर भागात सेठी एन्क्लेव्हमध्ये आपल्या आईसोबत राहत होती. दोन वेळा लग्न करूनही ते तुटलंय. सोनियाला आर्यन नावाचा एक मुलगा असून,तो सिमल्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम शिवांगी जोशी जगते अलिशान आयुष्य, पाहा PHOTO दिल्लीत एका विवाह जुळवणाऱ्या ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून 39 वर्षीय सोनिया भारद्वाज आणि उमंग सिंघार यांची भेट झाली होती. लवकरच ते दोघं लग्न करणार असल्याची चर्चा होती,मात्र त्याआधीच सोनियानं आत्महत्या केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया भारद्वाजच्या कुटुंबीयांना ती कुठं जाते,कोणाला भेटते याची काहीच कल्पना नव्हती. ती भोपाळला जात होती याचीही त्यांना माहिती नव्हती,वृत्तपत्रातून त्यांना सोनियानं भोपाळमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानं मोठा धक्का बसल्याचं तिचा भाचा दीपांशू यानं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून आपली मावशी सोनिया खूप तणावात होती तसंच नैराश्यावरील उपचारासाठी गोळ्याही घेत होती;पण तिनं या सगळ्या प्रकरणाबद्दल कधीच काही सांगितलं नव्हतं,असंही तो म्हणाला.

सोनियाच्या इतर काही नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार,सोनियाची स्वप्नं(Big Dreams)खूप मोठी होती. त्यामुळं वैयक्तिक आयुष्यात ती समाधानी नव्हती. सोनियानं पहिल्या पतीला सोडून एका बंगाली व्यक्तीशी दुसरं लग्न केलं होतं;पण तो तिला सोडून निघून गेला होता. दुसरं लग्न अयशस्वी ठरल्यानंतर सोनिया अंबालामधील लॅक्मे कंपनीत काम करत होती. नंतर इमिग्रेशनमधील नोकरी सोडून ती भोपाळमध्ये एका मार्केटिंग कंपनीत काम करण्यासाठी गेली होती. तिनं एकटीनंच आपल्या एकुलत्या एका मुलाला वाढवलं होतं. त्याची सगळी जबाबदारी तिच्यावरच होती.

अमृता फडणवीसांच्या शायरीनं ट्विटरवर राजकीय वादळ; रुपाली चाकणकरांनी केला पलटवार

सोनियाच्या मैत्रिणीच्या मते, स्लिमट्रीम, सुंदर दिसण्याची तिला खूप आवड होती. आपल्या मुलासोबत ती एखादा ड्रिंकचा पेगही शेअर करत असे; मात्र तिच्या आयुष्यात काही अडचण, कोणता दबाव असल्याचं तिनं कधी सांगितलं नव्हतं.

तिनं भोपाळमध्ये माजी मंत्री उमंग सिंघार यांच्या बंगल्यात आत्महत्या केल्यानं आणि ती त्यांची मैत्रीण असल्याची चर्चा सुरू झाल्यानं तिच्या जवळच्या लोकांना धक्का बसला आहे. सोनिया भारद्वाज यांच्या आत्महत्येमागचे गूढ पोलिस तपासात उलगडण्याची शक्यता आहे.

First published: