S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

आधी छातीवर SC-ST, आता कपडे उतरवून तरुण-तरुणींची एकत्र वैद्यकीय चाचणी

धक्कादायक म्हणजे तरुण उमेदवारांना अर्धनग्न उभं करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासमोरच तरुणींना उभं केलं होतं.

Sachin Salve | Updated On: May 2, 2018 05:32 PM IST

आधी छातीवर SC-ST, आता कपडे उतरवून तरुण-तरुणींची एकत्र वैद्यकीय चाचणी

मध्यप्रदेश,02 मे : मध्यप्रदेशमध्ये पोलीस भरतीत छातीवर एससी आणि एसएटी लिहण्याची घटना ताजी असतानाच आता तर वैद्यकीय चाचणीत तरुण आणि तरुणींना एकाच रूममध्ये उभं केल्याची बाब समोर आलीये. धक्कादायक म्हणजे तरुण उमेदवारांना अर्धनग्न उभं करण्यात आलं होतं आणि त्यांच्यासमोरच तरुणींना उभं केलं होतं.

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात पोलीस भरती सुरू आहे. या भरती दरम्यान उमेदवारांची  वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. पण ही चाचणी घेत असताना तरुण आणि तरुणींची एकत्रच चाचणी घेण्यात आली. शासकीय रुग्णालयात तरुण आणि तरुणीची वैद्यकीय चाचणी एकत्रच घेण्यात आली. या वेळी तरुणीचा चाचणी करण्यासाठी कोणतीही महिला डाॅक्टर हजर नव्हती. या चाचणीत तरुणी अर्धनग्न अवस्थेत होते.

मंगळवारी  39 तरुण -तरुणीची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यामध्ये 18 तरुणी आणि 21 तरुण सहभागी होते.ही घटना उजेडात आल्यानंतर शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close