५५ वर्षीय नराधमाचा ७ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

५५ वर्षीय नराधमाचा ७ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहे.

  • Share this:

20 डिसेंबर : मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यामध्ये ७वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका ५५ वर्षीय नराधमाने चिमुरडीच्या तोंडावर रुमाल बांधून  बेशुद्ध होईपर्यंत दुष्कृत्य केलंय. त्यावेळी सुदैवाने चिमुरडीचा मोठा भाऊ आणि बहीण तेथे आल्याने आरोपीने तेथून धूम ठोकली.

ही घटना धार जिल्हाच्या मनावर या गावातील आहे.  चिमुरडी आपल्या घरासमोर खेळत असताना नराधमाने तिच्या तोंडावर रुमाल बांधून जवळील शेतात नेऊन तीच्यासोबत दुष्कृत्य केलं. चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज तिच्या बहिणीला ऐकू गेल्याने तिची बहीण आणि भाऊ शेतात पोहचले त्या दोघांना पाहून नराधमाने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मनावर पोलीस घटनास्थळी पोहचली आणि चिमुरडीला मनावर येथील रुग्णालयात दाखल केलं. तेथे तिला प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. सध्या त्या चिमुरडीवर उपचार सुरू आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस शोध घेत आहे.

First published: December 20, 2017, 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading