आता वाहतुकीचे नियम मोडणं पडणार महागात, वाचा काय झालेत बदल

देशभरात 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम आणि नवीन दंड आकारणी सुरू होणार आहे.

  • Share this:

मोटार वाहन कायद्यानुसार आता 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना जास्त दंड भरावा लागणार आहे. सुरक्षित वाहतुक व्यवस्था राखण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नव्या कायद्यातील तरतुदी लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे. याची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होणार आहे.

वाहतुकीचा कोणताही नियम भंग केला तर किमान दंड 500 तर कमाल दंड 25 हजार रुपये आणि तीन वर्षे तुरुंगवास इतका आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनी नियम तोडले तर त्याची शिक्षा पालक आणि वाहन मालकांना भोगावी लागणार आहे.

वाहन चालवताना परवाना असणे बंधनकारक आहे. तो नसल्यास 500 रुपये दंड आकारला जात होता. यापुढे तो 5 हजार इतका होणार आहे. तसेच वेगाची मर्यादा ओलांडल्यास 400 रुपयांवरून 2 हजार इतका दंड द्यावा लागणार आहे.

रस्त्यांच्या वाहतुक नियमांचा भंग केल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. त्याशिवाय प्रशासनाचा आदेश भंग केला तर आता 2 हजार रुपयांचा दंड कऱण्यात येईल. तसेच विमा नसेल किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती दुचाकीवर असतील या दोन्ही नियमांसाठी दोन हजार रुपयांचा दंड होईल.

परवाना जवळ न बाळगता वाहन चालवणं, धोकादायक अवस्थेतील वाहन चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी आधी 500 ते 1000 रुपये दंड भरावा लागत होता.

पात्र नसताना, परवाना काढला नसताना वाहन चालवल्यास, मद्यपान करून  वाहन चालवल्यास, अॅम्ब्युलन्सला वाट न देणे यासाठी नव्या नियमानुसार 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 10:48 AM IST

ताज्या बातम्या