वाहनचालकाला तब्बल 1 लाख 16 हजारांचा दंड पण खरी बातमी तर पुढेच आहे

यामीन खान यांनी 5 महिन्यांपूर्वीच जकर हुसेनला नोकरीवर ठेवलं होतं. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे दंडाच्या रकमेचे पैसे दिले आणि दिल्लीच्या रेवाडी RTO कार्यालयात भरून यायला सांगितलं...

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 06:55 PM IST

वाहनचालकाला तब्बल 1 लाख 16 हजारांचा दंड पण खरी बातमी तर पुढेच आहे

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या मोटर व्हेइकल अॅक्टनुसार वाहनचालकांना जबर दंड भरावा लागतोय. असंच दिल्लीतल्या एका वाहनचालकाला ओव्हरलोडिंगमुळे

तब्बल 1 लाख 16 हजार रुपयांचा दंड भरावा लागला. यामीन खान या वाहनधारकाने ड्रायव्हर जकर हुसेनला हे दंडाचे पैसे दिले आणि हा दंड RTO मध्ये जाऊन जमा करायला सांगितलं. त्यांचा ड्रायव्हर हे चलन भरण्याऐवजी पैसे घेऊन फरार झाला!

मालकाला शिकवला धडा

यामीन खान यांनी 5 महिन्यांपूर्वीच जकर हुसेनला नोकरीवर ठेवलं होतं. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे दंडाच्या रकमेचे पैसे दिले आणि दिल्लीच्या रेवाडी RTO कार्यालयात भरून यायला सांगितलं. ते पैसे भरण्यासाठी ड्रायव्हर गेला खरा पण नंतर मात्र गायब झाला. त्याने त्यांचे फोन घेणंही बदं केलं. यानंतर यामीन खान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.उत्तर प्रदेशात फिरोजाबादच्या पोलिसांनी ड्रायव्हर जकर हुसेनला अटक करून दिल्लीला आणलं आणि त्याच्याकडून पैसे वसूल केले होते.

ओव्हरलोडिंगसाठी जबर दंड

Loading...

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एवढा दंड बसल्यामुळे या ड्रायव्हरला मालकांनी फटकारलं. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी ड्रायव्हर पैसे घेऊन फरार झाला.

सुधारित वाहन कायद्यामध्ये दंडासाठी वेगळे नियम करण्यात आले आहेत. ओव्हरलोडिंगसाठी 2 हजार रुपयांपेक्षा वाढवून ते 20 हजार रुपये झाले. जादा वजनासाठी प्रति टन एक हजार रुपयांपासून 2 हजार रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जबर दंड बसतो.

खरं की खोटं? व्हायरल झालेला हा फोटो विक्रम लँडरचा आहे का?

===============================================================================================

VIDEO : राज्याच्या राजकारणात आणखी एका पुतण्याची बंडखोरी, सेनेचा झेंडा घेतला हाती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crimeRTO
First Published: Sep 9, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...