लसीकरणासाठी आईचा दुहेरी संघर्ष; लेकीला पाठीवर घेऊन ओलांडली नदी, कोविड योद्ध्याचा फोटो व्हायरल

लसीकरणासाठी आईचा दुहेरी संघर्ष; लेकीला पाठीवर घेऊन ओलांडली नदी, कोविड योद्ध्याचा फोटो व्हायरल

Viral Photo: एक नर्स आपल्या चिमुकल्या लेकीला पाठीवर घेऊन धोकादायक पद्धतीनं नदी पार (nurse crossing river with daughter) करताना दिसत आहे. तिच्या पाठीवर लेक आणि हातात लशीचा कंटेनर आहे.

  • Share this:

रांची, 23 जून: कोरोना विषाणूनं (Corona virus) देशात शिरकाव केल्यापासून कोरोना योद्धा (Corona Warrior) म्हणून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी संघर्ष करत आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. अनेक वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) होतं आहे. ज्यामध्ये एक नर्स आपल्या चिमुकल्या लेकीला पाठीवर घेऊन धोकादायक पद्धतीनं नदी पार (nurse crossing river with daughter) करताना दिसत आहे. तिच्या पाठीवर लेक आणि हातात लशीचा कंटेनर आहे. ती दुर्गम भागातील लोकांचं लसीकरण करण्यासाठी जात आहे.

या फोटोत तुम्ही पाहू शकता, संबंधित नर्स आपल्या चिमुकल्या बाळाला आपल्या पाठीवर बांधून नदी पार करताना दिसत आहे. ही नर्स नदीच्या पलिकडे असलेल्या गावात जाऊन कोरोना संबंधित जागरूकता निर्माण करण्याचं काम करत आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या आरोग्य कर्मचारी महिलेचं नाव मानती कुमारी असून त्या झारखंड राज्यातील रहिवासी आहेत.

हेही वाचा- कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका!

गेल्या काही दिवसांपासून मानती यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होतं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी मानती यांच्यावर कौतुकाचा वर्षा केला असून त्यांच्या जिद्दीला सलाम ठोकला आहे. मानती यांनी आपल्या चिमुकल्या लेकीला पाठीवर आणि हातात लशीचा कंटेनर घेऊन बुढा नदी पार केली आहे. ही नदी पार करून त्या तिसिया, गोयरा आणि सुगाबांध या गावांत जाऊन नागरिकाचं लसीकरण करतात.

हेही वाचा- कोविड योद्ध्यांच्या जिद्दीला सलाम! दुर्गम भागात रुग्णसेवेसाठी जेसीबीतून पार केली नदी

मानती यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. राजकीय कार्यकर्ते आणि स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी हा फोटो ट्विट केला असून या फोटोला आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.

Published by: News18 Desk
First published: June 23, 2021, 1:24 PM IST

ताज्या बातम्या