आईने चिमुकलीला नाल्यात फेकून दिलं पण भटक्या कुत्र्यांनी मात्र जीव वाचवला

आईने चिमुकलीला नाल्यात फेकून दिलं पण भटक्या कुत्र्यांनी मात्र जीव वाचवला

मुलगी झाली म्हणून आईनेच पोटच्या मुलीला जिवंतपणी नाल्यामध्ये फेकून दिलं पण या मुलीचं दैव एवढं बलवत्तर की तिला भटक्या कुत्र्यांनी वाचवलं. हरियाणामधल्या कैथलमध्ये ही घटना घडली आहे.

  • Share this:

कैथल (हरियाणा) 20 जुलै : आईच्या पोटातला गर्भ जर मुलीचा असेल तर बेकायदेशीररित्या गर्भपात करण्याच्या घटना आपल्याकडे सर्रास घडतात. मुलगी झाली म्हणून तिला कचराकुंडीत फेकून देण्याच्या घटनाही थांबलेल्या नाहीत.

अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. मुलगी झाली म्हणून आईनेच आपल्या बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिलं. हरियाणामधल्या कैथलमध्ये ही लाजिरवाणी घटना घडली पण हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले आणि त्यांनी मुलीला वाचवलं. आईने निर्घृणपणे फेकून दिलं पण या चिमुकल्या जीवाच्या मदतीला कुत्रे धावले.

या महिलेने मुलीला फेकून दिल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. इथल्या डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडली.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत घडणार 'ही' एक वाईट घटना

या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीतून बाहेर काढून जोरजोरात भुंकू लागले. त्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक तिथे जमले. त्यावेळी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली ही छोटी मुलगी त्यांच्या नजरेला पडली. त्यांनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली.

पोलसांनी या चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. ही मुलगी जिवंत आहे पण तिची प्रकृती नाजूक आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तिची तब्येत स्थिर झाल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवलं जाणार आहे.

======================================================================================

छोट्या एक शिंगी गेंड्याची मोठी अंघोळ, शॉवर बाथचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading