आईच शेवटी ती! तब्बल 1000 किमी दूर असलेल्या बाळाला दररोज विमानाने पाठवते आपलं दूध

आईच शेवटी ती! तब्बल 1000 किमी दूर असलेल्या बाळाला दररोज विमानाने पाठवते आपलं दूध

आईचे दूध हे मुलासाठी एक वरदान असते, म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होत नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. आईचे दूध निर्जंतुक असते, म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. अशी एक आई चक्क शेकडो किमी लांब आपल्या नवजात बाळाला ब्रेस्ट मिल्क पाठवत आहे. 20 जूनपासून दररोज ही आई लेहहून ब्रेस्क मिल्क आपल्या बाळासाठी दिल्लीला पाठव आहे. हे दूध विमानाने विमानाने लेहहून दिल्लीला पोहोचते आणि त्यानंतर बाळाला दिले जाते. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र असे खरच घडले आहे.

लेहमधील रहिवासी जिकमेट वांगडू यांच्या घरी 16 जून रोजी मुलाचा जन्म झाला. त्यांची पत्नी दोर्जे पाल्मो यांची सीझरियन प्रसूती झाली. मात्र बाळाच्या जन्मानंतर त्याची अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकांशी जोडलेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्वरित बाळावर शस्त्रक्रिया करावी लागली. जिकमेट वांगडू हे म्हैसूरमध्ये शिक्षक आहेत आणि सीझरियन शस्त्रक्रिया झाल्यामुळे आई दोर्जे बाळाला घेऊन दिल्ली येऊ शकत नव्हती, म्हणून मुलाचा मामा नवजात बाळाला घेऊन दिल्लीत पोहचला.

वाचा-तब्बल 8 वर्षांनी 'या' गावात झाला बाळाचा जन्म, लोकसंख्या फक्त 29!

दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात डॉ. हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात 19 जून रोजी मुलाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियानंतर डॉक्टरांनी सांगितले की नवजात मुलासाठी आईचे दूध सर्वात महत्वाचे आहे. मात्र आई लेहला आणि बाळ दिल्लीत, असे असताना काय करायचे असा प्रश्न जिकमेट यांच्यासमोर होता. त्यानंतर जेकमेट यांनी पत्नीला सांगितले की, आईचे दूध विमानाद्वारे दिल्लीला पाठवता होईल, मात्र दररोज हे करावे लागणार आहे. यासाठी जेकमेट यांनी लेह विमानतळावर काम करणार्‍या काही मित्रांची मदत घेतली.

वाचा-आता घरीही तुम्ही कोरोना संसर्गापासून सुरक्षित नाही, तज्ज्ञांचा नवा दावा

यानुसार 20 जूनपासून रोज बाळाची आई लेह विमानतळावर दूध पोहचवते, त्यानंतर विस्तारा एअरलाईन्स हे दूध दिल्लीला पोहचवतात. जिकमेट यांनी सांगितले की, "बाळासाठी आई काहीह करू शकते. हे सगळं करणं सोपं नाही आहे, पण मुलासाठी सगळं करावं लागत आहे. आम्हाला या सगळ्यात जवळच्या लोकांनी आणि प्रियजनांनी खूप केली". जिकमेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाला 1-2 दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

वाचा-कडक सॅल्यूट! त्याचा 'काळ' आला होता पण पुणे पोलिसांनी येऊ दिली नाही 'वेळ'

यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, दिल्लीत आता ब्रेस्ट मिल्क बँक आहे. मात्र जेकमेट यांनी बाळाला आईचेच दूध देण्याचे ठरवले आणि चोख व्यवस्थाही केली. मुलाच्या पालकांनी जे काही केले, तै कौतुकास्पद आहे. डॉक्टरानी सांगितले की, या बाळाची प्रकृती नाजूक होती, मात्र आईचे दूध त्याच्यासाठी वरदान ठरलं आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: July 22, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या