VIDEO : बघा...जिन्यातून पडणाऱ्या मुलाला बहाद्दूर आईनं कसं वाचवलं!

VIDEO :  बघा...जिन्यातून पडणाऱ्या मुलाला बहाद्दूर आईनं कसं वाचवलं!

देव तारी त्याला कोण मारी ? असं म्हणतात. पण हा चिमुकला त्याहीपेक्षा नशीबवान निघाला. त्याला देवाने नाही तर आईनेच देवासारखं येऊन तारलं. कोलंबियामधला हा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

  • Share this:

देव तारी त्याला कोण मारी ? असं म्हणतात. पण हा चिमुकला त्याहीपेक्षा नशीबवान निघाला. त्याला देवाने नाही तर आईनेच देवासारखं येऊन तारलं. कोलंबियामधला हा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

या देशातल्या मेडेलिनमधली ही घटना आहे. इथल्या इमारतीत चौथ्या मजल्यावरून एक चिमुकला खाली पडत होता. पण त्याच्या आईने सुपरवुमनसारखी उडी मारून या चिमुरड्याला वाचवलं.

या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना चित्रित झाली आहे. ही महिला तिच्या मुलासह इमारतीच्या लिफ्टमधून बाहेर आली. ती तिच्या मोबाइलमध्ये काहीतरी बघत असताना हा चिमुरडा जिन्याच्या जवळ गेला. या जिन्याच्या रेलिंगमध्ये बरीच फट होती. त्यातून हा मुलगा खाली पडणार तोच त्याच्या या बहाद्दूर आईने लांब उडी मारून त्याला बाहेर काढलं.

हे होईपर्यंत बाकीच्या महिलाही तिथे पोहोचल्या. या महिलेनं प्रसंगावधान राखून मुलाला वाचवल्याबद्दल त्यांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. हा चिमुरडा तर वाचला पण काही क्षणांसाठी त्या आईचं काय झालं असेल याची कल्पना केलेली बरी. या आईने क्षणाचाही विलंब न लावता मुलाला वाचवलं खरं पण ती मोबाइलमध्ये व्यग्र असताना तिची नजर चुकवून हा चिमुरडा जिन्याजवळ गेला हेही तुमच्या लक्षात आलं असेल. मोबाइलच्या अतिरेकी वापरानं किती भयंकर अपघात होऊ शकतात याचाच हा इशारा आहे. हा व्हिडिओ या इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या