उन्हात खेळू देण्यास आईचा नकार; 13 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

उन्हात खेळू देण्यास आईचा नकार; 13 वर्षांच्या मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

उन्हात खेळण्यास आईनं नकार दिल्यानं 13 वर्षांच्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं.

  • Share this:

जयपूर, 02 जून : उन्हात खेळण्यास आईनं नकार दिला. त्यामुळे राग आलेल्या 13 वर्षाच्या मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

ईशा असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे. ईशाला खेळायचं होतं. पण, ऊन असल्यामुळे आईनं उन्हात खेळण्यास नकार दिला. त्यामुळे राग आलेल्या ईशानं गळफास घेत आत्महत्या केली.

काय म्हणाले आई – वडील

ईशा उन्हात खेळत होती. त्यावेळी आईनं तिला उन्हात खेळू नकोस असं सांगितले. त्याचा राग हा ईशाला आला आणि तिनं आत्महत्या केल्याची माहिती ईशाच्या आई – वडिलांनी दिली.

या साऱ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


VIDEO: घोटभर पाण्यासाठी संघर्ष; रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: suicide
First Published: Jun 2, 2019 10:01 AM IST

ताज्या बातम्या