मराठी बातम्या /बातम्या /देश /दारू माफिया झालेल्या मुलीचा आईनेच काढला काटा; 50 हजारांची दिली सुपारी

दारू माफिया झालेल्या मुलीचा आईनेच काढला काटा; 50 हजारांची दिली सुपारी

आईने कट रचून आपल्या पोटच्या मुलीलाच संपवल्याच्या (Murder of Daughter) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  लेकीला अत्यंत क्रूरपणे मारण्यासाठी तिने 50 हजारांची सुपारी काही गुंडांना दिली.

आईने कट रचून आपल्या पोटच्या मुलीलाच संपवल्याच्या (Murder of Daughter) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लेकीला अत्यंत क्रूरपणे मारण्यासाठी तिने 50 हजारांची सुपारी काही गुंडांना दिली.

आईने कट रचून आपल्या पोटच्या मुलीलाच संपवल्याच्या (Murder of Daughter) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लेकीला अत्यंत क्रूरपणे मारण्यासाठी तिने 50 हजारांची सुपारी काही गुंडांना दिली.

बालासोर, 18 जानेवारी: एका आईने कट रचून आपल्या पोटच्या मुलीलाच संपवल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईने काही लोकांना 50 हजारांची सुपारी देवून तिने आपल्या मुलीची हत्या केली आहे. मृत मुलगी अवैध दारू व्यवसायात गुंतली होती. तिला वारंवार समजावून सांगितल्यानंतरही तिने आपल्या आईचं ऐकलं नाही. यातूनच त्यांच्या नात्यात फूट पडली होती. त्यामुळे आईने कट रचून आपल्या मुलीची हत्या करवली, असं उघड झालं आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आईचं नाव सुकुरी गिरी असून ती ओडिशातल्या बालासोर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने 32 वर्षीच्या प्रमोद जेना आणि अन्य दोन साथीदारांना आपल्याच मुलीची हत्या करण्यासाठी 50 हजारांची सुपारी दिली होती. या प्रकरणांत पोलीसांनी मुख्य आरोपी आई सुकुरी गिरी समवेत साथीदार प्रमोद जेनालाही अटक केली आहे. अन्य फरारी दोन आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती बालासोर उप विभागीय पोलीस अधिकारी परवश पाल यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेतील मृत मुलीचं नाव शिबानी नायक असून तिचं वय 36 वर्षे आहे. तसेच ती विवाहित असून ती आपल्या आई वडिलांसोबतच राहते. काही दिवसांपासून ती दारूच्या अवैध व्यवसायात गुंतली होती. तिला आईने अनेकदा समजावून सांगितल्यानंतरही तिने आईचं ऐकलं नाही. यामुळे मायलेकीच्या नातात दुरावा वाढत गेला. शेवटी कंटाळून आईने मुलीच्या हत्येचा कट रचला. तिने प्रमोद जेना नामक एका व्यक्तीला आपल्या मुलीला संपवण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यासाठी आठ हजार रुपये अॅडव्हान्सही दिले.

डोक्यात दगड घालून केली हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद जेना मृत शिबानी नायकला काही कामाच्या बहाण्याने नगराम गावातील एका पुलाखाली घेवून गेला. त्याठिकाणी अगोदरच सापळा रचून बसलेल्या दोन आरोपींच्या मदतीने प्रमोदने शिबानीची हत्या केली. शिबानीला काही कळायच्या आत आरोपींनी तिच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. त्यानंतर तिच्यावर दगडाने अनेक वार केले. या हल्लात शिबानीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला आणि हत्येचा सूत्रधार प्रमोद जेनाला अटक केली आहे. तसेच अन्य दोन साथीदारांना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder