गुरुदासपूर, 26 मे : अनैतिक संबंधामध्ये माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात, याचा काही नेम नाही. आपल्या नात्यातील एखाद्या माणसाचा जीव घ्यायला देखील ही लोक मागे-पुढे पाहत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्याच 26 वर्षीय मुलाचा आईनं प्रियकरासोबत मिळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही राक्षसी आई एवढेच करून थांबली नाही तर या दोघांनी मुलाचा मृतदेह नाल्या (गटार)मध्ये फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, संबंधित मृताच्या आईचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. त्या दोघांच्यामध्ये हा मुलगा अडचण ठरत होता. या मुलानं अनेकदा आईला असं करू नकोस म्हणून समजावलं होतं. मात्र, ती ऐकत नव्हती आणि या दोघांच्या संबंधांमध्ये अखेर 26 वर्षीय या मुलाला जीव गमवावा लागला. अनैतिक संबंधामध्ये एका आईनं उचलेल्या एवढ्या टोकाच्या निर्णयानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील झंडो गुजरू गावात एका ठिकाणी पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत काही लोकांना दिसून आला. त्यानंतर या घटनेची माहिती परिसरात वार्यासारखी पसरली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. मृतदेहाचे शवविच्छेदन आणि त्याची ओळख पटवण्यात आली. रणदीप सिंग असं मृताचे नाव होते. Dsp राजेश ककड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तपासात गती घेत थेट मृताच्या आईला गाठलं आणि चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या बोलण्यात संशय आल्यानं पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करत तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं. त्यानंतर दोघांचीही कसून चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासा समोर आला.
हे वाचा -
काँग्रेस आमदाराला महिलेनं अश्लील VIDEO कॉल करून दिला त्रास; ब्लॅकमेलनंतर प्रकरण उजेडात
मृत मुलाची आई रुपिंदरजीत कौर आणि सुखविंदर सिंग या दोघांमध्ये कित्येक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. याबाबत तिच्या मुलाला माहिती झाली होती. तेव्हापासून घरात वाद होत होता आणि मुलगा वारंवार आईला असं करण्यापासून परावृत्त करत होता. मात्र त्याच्या बोलण्याला वैतागून अखेर या राक्षसी आईनं त्याला ठार मारण्याचा प्लॅन केला. या नराधम आईनं सुखविंदर सिंग आणि त्याचा मित्र गुरुजित सिंग या दोघांच्या मदतीनं आपल्या मुलाचा खून केला. सध्या या दोघांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.