क्या बात है! लॉकडाऊनमध्ये सासूनेच लावून दिलं विधवा सुनेचं पुन्हा लग्न

सासू-सासऱ्यांनी केलं विधवा सुनेचं कन्यादान, लॉकडाऊनमध्ये असा पार पडला पुनर्विवाह.

सासू-सासऱ्यांनी केलं विधवा सुनेचं कन्यादान, लॉकडाऊनमध्ये असा पार पडला पुनर्विवाह.

  • Share this:
    रतलाम, 07 मे : कोरोनासारख्या कठीण काळात काही लोकं एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवत आहेत. असाच प्रकार मध्य प्रदेशातील रतलाम येथे घडला. 6 वर्षांआधीच ज्या सासूनं आपल्या सुनेला घरी आणलं, त्याच सुनेचा लेकीप्रमाणं विवाह लावून दिला. आपल्या विधवा सुनच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा, यासाठी या सासूनं सुनेचा पुनर्विवाह लावून दिला. लॉकडाऊनमध्ये अगदी साध्या पद्धधतीनं हा विवाह सोहळा पार पडला. मुख्य म्हणजे या लग्नात सासू-सासऱ्यांनीच सुनेचं कन्यादान केलं. सोशल डिस्टन्सिंग पालन करत तिन्ही परिवारांनी हा विवाह सोहळा पार पाडला. रतलाम येथील काटजू नगरमध्ये राहणाऱ्या 65 वर्षी सरला जैन यांचा मुलगा मोहित जैन याच्याशी 6 वर्षांपूवी आष्टा येथे राहणाऱ्या सोनमचा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर तीन वर्षांनी मोहितला कर्करोग झाला. त्यानंतर काही महिन्यांनी मोहितचा मृत्यू झाला. सोनमनं आपल्या पतीच्या मृत्यूनंतरही आपलं घर सोडलं नाही. ती सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली. याच दरम्यान सोनमच्या भावानं तिचा पुनर्विवाह करण्याचे सुचवले. सोनमचा विवाह नागदाच्या सौरभ जैनशी ठरलं. वाचा-विशाखापट्टणममध्ये अलर्ट! गॅस गळतीमुळे 7 जणांचा मृत्यू, 5000 जणांवर उपचार सुरू मात्र लॉकडाऊनमुळं त्यांना कोणतेही हॉटेल मिळाले नाही, अखेर सोनमच्या घरीच विवाह करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. 6 वर्षांपूर्वी आपलं घर सोडून सोनम जैन कुटुंबात आली होती, आता याच कुटुंबानं तिचं कन्यादान करत तिची पाठवणी केली. यावेळी सरला जैन आपल्या सुनेची पाठवणी करत असताना रडत होत्या. अगदी आई-मुलीप्रमाणं या दोघांचं नातं होतं. वाचा-मुलीला मास्क घालायला सांगितल्याचा राग, बापाने सेक्युरीटी गार्डला घातल्या गोळ्या या लग्नाबद्दल सासू सरला जैन म्हणाल्या की, सूनचे लग्न झालं कारण आता आम्ही दोघं पती-पत्नी आता राहिलो आहोत. आम्ही सुद्धा म्हातारे झाले आहोत, पण सुन अजून तरूण आहे. आम्ही गेल्यानंतर ती एकटेच तिचं आयुष्य कसं काढेल, म्हणून आम्ही तिचे पुन्हा लग्न लावून दिले. जेव्हा मी सूनला निरोप देत होते, तेव्हा माझी मुलगी घर सोडून जात असल्याचे मला वाटत होते. एकीकडे देश कोरोनासारख्या रोगाशी दोन हात करत असताना, माणुसकीचे आणि प्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या या घटना नक्कीच मनाला समाधान आणि आनंद देतात. वाचा-कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून
    First published: