अनूप पासवान, प्रतिनिधी
कोरबा, 17 मार्च : खूप काळजी आणि घाई केल्याने अनेकदा गोंधळ होतो आणि त्याचा परिणाम वाईट होतो. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका आईने नवजात मुलाला औषधाऐवजी कीटकनाशक दिले. त्यामुळे धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उर्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादर कला गावातील आहे. घाईघाईत मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अशी चूक केल्याने आई कुंवरबाई हिला मोठा पश्चाताप होत आहे. चार दिवसांच्या चिमुकल्या बाळाला खोकला आल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. गुरुवारी त्रास थोडा वाढला. मुलाचे दुःख आईला सहन झाले नाही. त्यामुळे तिने घरात ठेवलेल्या काही औषधांची झडती घेतली असता तिला एक बाटली सापडली.
मात्र, यामध्ये कीटकनाशक होते. यामुळे खोकला बरा होईल, असा विचार करून आईने नकळत आणि घाईघाईने मुलाच्या तोंडात कीटकनाशकाचे दोन-चार थेंब टाकले. यामुळे मुलाची प्रकृती खालावली. तेव्हा तिला आपली चूक लक्षात आली. तिने लगेचच कुटुंबीयांना आपली चूक सांगितली.
पोपटाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्याची मागणी, नेमका काय आहे हे प्रकरण?
यानंतर तत्काळ मुलाला कोरबा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. येथे त्याला एसएनसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. जीवरक्षक औषधांच्या मदतीने नवजात बालकाची प्रकृती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आईच्या चुकीमुळे सध्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.
या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, घटनेची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. सध्या मुलाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्याची प्रकृती सामान्य झाल्यावर कुटुंबीयांची चौकशी केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhattisgarh, Local18