मराठी बातम्या /बातम्या /देश /Social Media मुळे सापडली 8 वर्षांपूर्वी हरवलेली आई, एका VIDEO ने केला चमत्कार

Social Media मुळे सापडली 8 वर्षांपूर्वी हरवलेली आई, एका VIDEO ने केला चमत्कार

सोशल मीडियावर (Social Viral) व्हायरल (Viral) होणाऱ्या एका व्हिडिओमुळे (Video) एका कुटुंबाच्या आयुष्यात मोठा चमत्कार (Miracle) घडला आहे.

सोशल मीडियावर (Social Viral) व्हायरल (Viral) होणाऱ्या एका व्हिडिओमुळे (Video) एका कुटुंबाच्या आयुष्यात मोठा चमत्कार (Miracle) घडला आहे.

सोशल मीडियावर (Social Viral) व्हायरल (Viral) होणाऱ्या एका व्हिडिओमुळे (Video) एका कुटुंबाच्या आयुष्यात मोठा चमत्कार (Miracle) घडला आहे.

रायपूर, 19 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Viral) व्हायरल (Viral) होणाऱ्या एका व्हिडिओमुळे (Video) एका कुटुंबाच्या आयुष्यात मोठा चमत्कार (Miracle) घडला आहे. साधारण 8 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेल्या आईचा (Mother found) शोध या व्हिडिओमुळे लागला आणि दुसऱ्या राज्यात जाऊन मुलगा आईला पुन्हा घरी घेऊन आला.

मानसिक आजारामुळे सोडलं घर

छत्तीसगडमधील गोहेकला गावात राहणाऱ्या बलभद्र नागेश यांची आई गेल्या 8 वर्षांपासून गायब झाली होती. आईला विस्मरणाचा त्रास असल्यामुळे अनेकदा ती घरातून गायब होत असे, मात्र काही वेळाने ती पुन्हा घरी येत असे. आईला घर सापडलं नाही, तर गावातील ओळखीचे लोक तिला मदत करून घरी सोडत असत. मात्र 2013 साली आई घर सोडून निघून गेल्यानंतर परत आलीच नाही.

सर्वत्र शोध घेतला पण...

आई गायब झाल्यानंतर नागेश आणि त्यांच्या कुटुंबानं जंग जंग पछाडलं. गावात, तालुक्यात, आसपासच्या जिल्ह्यांतही शोध घेतला. मात्र आईचा काहीच पत्ता लागला नाही. आपली आई विसमरणामुळे कुठेतरी निघून गेली असली, तरी ती जिथं असेल तिथं सुरक्षित असेल, अशी अपेक्षा करण्यापलिकडं नागेश यांच्या हाती काहीच उरलं नव्हतं. या घटनेला 7 वर्षं झाल्यानंतर म्हणजेच 2020 साली त्यांना ईचं श्राद्ध करण्याची सूचना समाजातील व्यक्तींनी केली. आपली आई जिवंत असल्याचा विश्वास नागेश व्यक्त करत असले, तरी 7 वर्षं आई परत न आल्यामुळे त्यांनी नाईलाजाचे आईचे श्राद्धही घातले.

हे वाचा -पत्नीवर उकळतं पाणी फेकत त्याने गाठला विक्रूतीचा कळस, समोर आलं संतापजनक कारण

असा लागला शोध

गावातील काही मंडळींना व्हॉट्सअपवरून एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसला. अनेक ग्रुपमधून फॉरवर्ड होत असलेल्या या व्हिडिओत दिसणारी महिला नागेश यांच्या आईसारखी वाटल्याने गावातील काहींनी तो व्हिडिओ नागेश यांना पाठवला. नागेश यांनी तो व्हिडिओ पाहताच ती महिला आई असल्याची खात्री त्यांना पटली. त्या व्हिडिओच्या ठिकाणाची माहिती जमवायला त्यांनी सुरुवात केली. ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील एका गावात हा व्हिडिओ शूट झाल्याचं समजल्यावर नागेश सहकुटूंब तिकडे गेले आणि दोनच दिवसांत त्यांना आईचा शोध लागला, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.

आईला घेऊन ते आता परत आपल्या घरी आले असून आई जिवंत असताना श्राद्ध करावं लागल्याचं वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

First published:

Tags: Social media, Video