इदौर, 16 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आलं आहे. यामुळे लोक घरातच अडकून पडले आहेत. दरम्यान, अनेक हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग समोर येत आहेत. आता एका आईला मुलाला शेवटचं पाहता आलं नाही. 14 वर्षीय मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी वडिलांनी ताल इथून इंदौरला आणलं होतं. उपचारावेळीच त्याने इदौंरमध्ये प्राण सोडले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आईला मुलाजवळ पोहोचता आलं नाही. ी पण बुधवारी मुलाचा रुग्णालयातच मृत्यू झाला. यानंतर मुलाचे अंत्यसंस्कार कऱण्यासाठी मृतदेह गावी ताल इथं घेऊन जाऊ द्यावं अशी विनंती वडिलांसह नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही.
शेवटी वडिलांसह तिथं असलेल्या नातेवाईकांनी मुलावर इदौरमध्येच अंत्यसंस्कार कऱण्याचा निर्णय घेतला. तेव्हा गावाकडे असलेल्या नातेवाईकांनी व्हिडिओ कॉल करून आई, बहीण आणि भावाला 14 वर्षीय मुलाचं शेवटचं दर्शन दिलं. बाप मुलाला मुखाग्नी देत होता आणि आईसह बहीण भाऊ व्हिडिओ कॉलवर आक्रोश करत होते.
हे वाचा : भारताने करून दाखवलं! महाभयंकर कोरोनाला रोखण्यात जगात अव्वल
मुलगा सातवीत शिकत होता. तो 2009 मध्ये शाळेच्या बसमधून पिकनिकसाठी गेला होता. त्यावेळी बस नदीत कोसळली होती. या दुर्घटनेत सात मुलांसह शिक्षिकेचाही मृत्यू झाला होता. या 14 वर्षीय मुलाच्या मोठ्या बहिणीलाही दुर्घटनेत प्राण गमवावे लागले होते.
हे वाचा : 3 महिन्यांच्या बाळासह सून दारात, घरात घेणं दूरच पण चिमुकल्याला दूधही दिलं नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus