Home /News /national /

पैशांसाठी जन्मदात्या आईनेच मुलीला करायला सांगितले नको ते काम, नात्याला काळीमा फासणारी घटना

पैशांसाठी जन्मदात्या आईनेच मुलीला करायला सांगितले नको ते काम, नात्याला काळीमा फासणारी घटना

20 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर बरैलीच्या सुभाषनगर पोलीस ठाण्यात पीडितेची आई, मावशी, काका आणि मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बरैली (उत्तरप्रदेश), 8 जून : उत्तरप्रदेशच्या बरैलीतील (Bareilly) एका तरुणीने आपली आई आणि नातेवाईकांवर धक्कादायक आरोप केला आहे. तिने आरोप केला आहे की, तिला तिची आई, मावशी आणि मामांनी तिला जबरदस्तीने देहव्यापार करायला भाग पाडले. आरोप केलेल्या तरुणीचे वय 20 आहे. काय आहे घटना -  नुकतीच ही 20 वर्षीय मुलगी मुंबईहून आपल्या घरी बरैली येथे आली. तिने आरोप केला की, तिच्या दोन मामांनीही तिच्यावर दुष्कृत्य (Physical Abused) केले आणि तसेच तिला देहव्यापार चालू ठेवण्यासाठी तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. 20 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर बरैलीच्या सुभाषनगर पोलीस ठाण्यात (Subhash Nagar Police Station) पीडितेची आई, मावशी, काका आणि मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोहित सिंह सजवान यांनी दिली. खोटे बोलून मामांकडे पाठवले आणि... याप्रकरणी माहिती अशी की, 20 वर्षीय तरुणी ही सुभाषनगर येथील रहिवासी आहे. मागच्या वर्षी तिच्या आईने एका अनोळखी व्यक्तिकडून पैसे घेतले आणि तिच्या मुलीसोबत त्या माणसाला दुष्कर्म करू दिले. यानंतर या 20 वर्षीय तरुणीला रोजच्या पैशांसाठी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाऊ लागले. या तरुणीने विरोध केल्यानंतर तिची आई, मावशी आणि मावशीच्या नवऱ्याने (काका) खोटे बोलून तिला मुंबई येथे तिच्या दोन सख्ख्या मामांकडे पाठवून दिले, असा आरोपही तिने केला. बरैलीच्या जिल्हा प्रोबेशन अधिकारी (District Probation Officer) नीता अहिरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आरोप केला आहे की, तिच्या दोन्ही मामांनी तिला मुंबईतील डान्सबारमध्ये काम करण्यास भाग पाडले आणि नकार दिल्यावर तिला मारहाण केली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्याच्या दोन्ही मामांनी त्याला वेश्या व्यवसायात ढकलले. 16 मे रोजी तिने वेश्या व्यवसायाला विरोध केला असता तिच्या दोन्ही मामांनी तिच्यावर बलात्कार केला. तर त्याच्या दोन्ही काकांना ते दुबईतील कुणाला तरी पैशासाठी विकायचे होते. हेही वाचा - वाढदिवसाच्या पार्टीसाठी रात्री मित्रांसोबत गेला तरुण, अन् सकाळी कारमध्ये 'या' अवस्थेत सापडला मृतदेह तरुणीने सांगितले की, संधी मिळताच ती मुंबईहून बरैलीला पळून गेली आणि जिल्हा प्रोबेशन अधिकारी नीता अहिरवार यांना भेटली. यानंतर अहिरवार यांनी पीडित मुलीला एसएसपींना भेटायला लावले आणि त्यांच्या सूचनेनुसार एफआयआर नोंदवण्यात आला. यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape, Sexual assault, Sexual harassment, Up crime news

    पुढील बातम्या