Home /News /national /

जोशी कुटुंबासाठी कोरोना काळ बनून आला, 5 दिवसात आईपाठोपाठ दोन मुलींचाही मृत्यू

जोशी कुटुंबासाठी कोरोना काळ बनून आला, 5 दिवसात आईपाठोपाठ दोन मुलींचाही मृत्यू

कोरोना या कुटुंबासाठी जणू काळच ठरत आहे. उज्जैनमध्ये एकाच कुटुंबातील दोन मुली आणि त्यांच्या आईचा केवळ पाच दिवसात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कोरोनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (फीचर फोटो-सांकेतिक)

पुढे वाचा ...
    उज्जैन, 27 एप्रिल: देशात कोरोनाबाधितांची संख्या (Corona in India) वाढत आहे, असे असले तरी सरकारी आकडेवारीनुसार मृत्यूदर 1 ते 1.60 टक्के (Corona Death Rate) एवढा आहे. म्हणजेच रुग्णांच्या प्रमाणात होणारे मृत्यू अत्यल्प आहेत. मात्र, हा कोरोना काही कुटुंबासाठी जणू काळच ठरत आहे. उज्जैनमध्ये एकाच कुटुंबातील दोन मुली आणि त्यांच्या आईचा केवळ पाच दिवसात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कोरोनाबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाजापूरमध्ये कोरोनाची लागण झालेली संबंधित महिला उज्जैनमध्ये (Ujjain Madhya pradesh) आपल्या बहिणीच्या घरी गेली होती. तेव्हा तिच्या बहिणीलाही संसर्ग झाला. उज्जैनमध्ये आपली आई आजारी पडल्याचे समजल्यावर त्यांची देखभाल करण्यासाठी तिच्या दोन मुली माहेरी आल्या. मात्र, दुदैवाने या दोघींनाही कोरोनाची लागण झाली. आई आणि या दोन मुली, अशी तिघांचीही प्रकृती बिघडत गेली आणि या तिघींचाही अखेर कोरोनाने मृत्यू झाला. आता केवळ 22 वर्षांचा मुलगा या कुटुंबात उरला आहे. तोही कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, मात्र तो या आजारातून बरा झाला आहे. उज्जैनच्या महामृत्युंजय गेटजवळील वृंदावनधाम कॉलनीत राहणाऱ्या संध्या जोशी यांच्या कुटुंबासाठी कोरोना जणू काळ म्हणून आला. पाच दिवसांच्या अंतरात आई आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. या तिघींना एकमेकांपासूनच कोरोना संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. 19 एप्रिल रोजी आईचा मृत्यू, त्यानंतर 20 एप्रिलला त्यांच्या दुसऱ्या मुलीचा आणि तीन दिवसांनंतर 23 एप्रिलला मोठ्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असा झाला संसर्ग उज्जैनच्या एमपीईबीचे सेवानिवृत्त कर्मचारी रंजन जोशी यांचे आधीच निधन झाले होते. त्यांची 55 वर्षांची पत्नी संध्या जोशी यांच्या वृंदावनधाम येथील घरी त्यांची बहीण शाजापूरहून आली होती. त्यावेळी त्यांना घसा खवखवणे आणि सर्दी अशी लक्षणे होती. त्या तिथे राहून गेल्यानंतर संध्या जोशी यांनाही सर्दी, खोकला येऊ लागला. त्यांना आरडी गार्डी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हे वाचा - दिलासादायक! मोठ्या वाढीनंतर सोमवारी देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 2764 जणांचा मृत्यू) आईची प्रकृती खालावत असल्याचे पाहून आणि उज्जैनमध्ये त्यांचा भाऊ एकटाच असल्याने संध्या यांच्या दोन मुली, 35 वर्षीय श्वेता नगर आणि 34 वर्षीय नम्रता मेहता इंदूरहून उज्जैन येथे आईच्या सेवेसाठी आल्या. त्यानंतर श्वेताला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे श्वेताला तेजनकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 19 एप्रिल रोजी संध्या जोशी यांचे आरडी गार्डी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी 20 एप्रिल रोजी, नम्रताची तब्येत बिघडली आणि उज्जैन येथे तिचे निधन झाले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्वेताचाही 23 एप्रिलला मृत्यू झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Madhya pradesh

    पुढील बातम्या