मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक: मुख्यमंत्र्यांच्या ऑफिससमोर माय लेकींचा आत्मदहनाचा प्रयत्न, एका क्षणात घेतलं पेटून

धक्कादायक: मुख्यमंत्र्यांच्या ऑफिससमोर माय लेकींचा आत्मदहनाचा प्रयत्न, एका क्षणात घेतलं पेटून

त्यांनी स्थानिक कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊस उचललं असं सांगितलं जात आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar
लखनऊ17 जुलै: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आज एका घटनेनं हादरून गेलं. मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर माय लेकीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कार्यालय असलेल्या लोकभवन इथं ही घटना घडली. या दोघीही  अमेठीच्या आहेत. त्यांच्या जमीनीचा वाद लवकर सुटत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. लोक भवनच्या गेट क्रमांक 3 वर ही घटना घडली. त्या दोघींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. त्यातल्या आईची प्रकृती गंभीर आहे. या दोघींनी अंगावर रॉकेल टाकून पेटून घेतलं. अंगाला आग लागलेली असतांना त्या धावत होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र तोपर्यंत त्या जास्त प्रमाणात भाजल्या होत्या. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून त्या महिलांना जे काम होतं त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रकोप असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. असं असतांनाही त्या महिला मुख्यमत्र्यांच्या ऑफिससमोर येतात आणि स्वत:ला पेटवून घेतात यावरून सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. त्या दोनही महिला अमेठीच्या असल्यामुळे त्याची जास्त चर्चा होत आहे. त्या महिलांच्या जमीनीचा नेमका वाद काय होता. त्यांनी स्थानिक कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊस उचललं असं सांगितलं जात आहे.
First published:

Tags: Uttar pradesh

पुढील बातम्या