Home /News /national /

तुम्हीही गिझर वापरत असाल तरी ही बातमी नक्की वाचा; बाथरूममध्येच मायलेकीनं गमावला जीव

तुम्हीही गिझर वापरत असाल तरी ही बातमी नक्की वाचा; बाथरूममध्येच मायलेकीनं गमावला जीव

पोलिसांना असा संशय आहे, की बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गिझरमधून विषारी गॅस कार्बन मोनोऑक्साईड लीक (Carbon Monoxide Gas Leak) झाला आणि याचा कारणामुळे मायलेकीचा गुदमरून मृत्यू झाला

  बंगळुरू 18 जानेवारी : कर्नाटकच्या बंगळुरू येथून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत गिझरमधून (Geyser) बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे (Poisonous Gas) दम कोंडून मायलेकीचा मृत्यू झाला आहे. तुम्हीही जर गिझर वापरत असाल तर ही बातमी नक्की वाचा. द टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, ही घटना बंगळुरु येथील गणपती नगर परिसरातील आहे. घटनेत 35 वर्षीय महिला आणि तिच्या सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. दोघींचेही मृतदेह बाथरूममध्ये आढळून आले. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मागाल ते देतो, काळजाच्या तुकड्याला सोडा, अपहरण झालेल्या लेकासाठी बापाची आर्त हाक पोलिसांना असा संशय आहे, की बाथरूममध्ये बसवण्यात आलेल्या गिझरमधून विषारी गॅस कार्बन मोनोऑक्साईड लीक (Carbon Monoxide Gas Leak) झाला आणि याचा कारणामुळे मायलेकीचा गुदमरून मृत्यू झाला. मात्र, पोलीस अद्याप अनेक अंगांनी या घटनेचा तपास करत आहेत. पोलीस हा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत, की गिझरमधून कार्बन मोनोऑक्साईड गॅस लीक कसा झाला. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा घरमालकाने महिला कुठे आहे, याचा शोध घेतला. महिला पतीचा कॉल उचलत नसल्याने त्याने घरमालकाला घरात जाऊन पत्नीला फोन करण्यास सांगण्यासाठी सांगितलं होतं. घरात गेल्यावर घरमालकाने जेव्हा महिला आणि तिच्या मुलीला मृतावस्थेत पाहिलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. घराचा दरवाजा बंद असल्याने घरमालक खिडकीतून आतमध्ये शिरला होता.

  मकरसंक्रातीला घरातून निघाले जिगरी दोस्त, नंतर असं घडलं की.. वाशिम जिल्हाच हादरला

  पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आतापर्यंतच्या निरीक्षणावरुन असं लक्षात येतं, की महिला आणि तिची मुलगी जेव्हा बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेल्या तेव्हा गिझरमधून निघणाऱ्या विषारी गॅसमुळे त्या तिथेच बेशुद्ध झाल्या. यानंतर गुदमरून इथेच दोघींचा मृत्यू झाला. बाथरूमची खिडकी बंद असल्याने विषारी गॅस बाथरूममधून बाहेर पडू शकला नाही.
  First published:

  Tags: Death, Shocking news

  पुढील बातम्या