अनोखं लग्न! मुलगी आणि आईनं एकाच मंडळात घेतल्या सप्तपदी

अनोखं लग्न! मुलगी आणि आईनं एकाच मंडळात घेतल्या सप्तपदी

गोरखपूर (Gorakhpur) येथे नुकताच संपन्न झालेल्या मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 63 जोडप्यांनी आपले संसार थाटले असून या सामूहिक विवाह सोहळ्यात आई आणि मुलगी अशा दोघींचीही लग्न झाली आहेत.

  • Share this:

गोरखपूर, 13 डिसेंबर: गोरखपूर (Gorakhapur) जिल्ह्यातील पिपरौली ब्लॉकमध्ये एक अनोखा विवाहसोहळा पार पडला आहे. येथे आईने आणि मुलीने एकाच मंडपात लग्न केलं आहे. गोरखपूर येथे नुकताच संपन्न झालेल्या मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात एकूण 63 जोडप्यांनी आपले संसार थाटले. या सामूहिक विवाह सोहळ्यात आई आणि मुलगी अशा दोघींचीही लग्न झाली आहेत.

कुरमौल गावात राहणाऱ्या 55 वर्षीय जगदीशचं अद्याप लग्न झालं नव्हतं. त्यानं आपली सख्खी वहिनी 55 वर्षीय बेला देवी यांच्याशी लग्न केलं आहे. त्यामुळं हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. या दोन्ही जोडप्यांना उपस्थितांनी भरभरून आशिर्वाद दिले आहेत.

बेला देवीचे पती म्हणजेचं जगदीशच्या भावाचं 25 वर्षांपूर्वी निधन झालं होत. जगदीशला 3 भाऊ होते. ज्यामध्ये जगदीश हा सर्वात धाकटा आहे. तर बेला देवीला 2 मुलं आणि 3 मुली आहेत. यातील दोन मुलं आणि 2 मुलींचं यापूर्वीच लग्न झालं आहे. सर्वात लहान मुलगी इंदू हीचं गुरूवारी मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न पार पडलं. बेला देवी आणि जगदीश यांनीही याच मंडपात लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी त्यांनी कुटुंबातील सदस्यांकडून लग्नाची परवानगी घेतली होती.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह सोहळ्यात दीर- भावजय आणि मुलगी- जावई अशा दोन्ही जोडप्यांनी एकाच मंडपात लग्न केल्यानं उपस्थित असणाऱ्या लोकांमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं. या अनोख्या लग्नामुळे दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना आनंदी झाला आहे. पण मुलगी आणि आईचं एकाच मंडपात लग्न होणं, अशी घटना क्वचितच घडते. त्यामुळं हे लग्न येथील मंडपात प्रमुख आकर्षक बनलं होतं.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 9:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या