मराठी बातम्या /बातम्या /देश /'माझा भाऊ खूप धाडसी, निराश करणार नाही'; प्रियांका गांधींचं भावनिक आवाहन

'माझा भाऊ खूप धाडसी, निराश करणार नाही'; प्रियांका गांधींचं भावनिक आवाहन

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.

    नवी दिल्ली, 4 एप्रिल : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. ''मतदारांनो, माझ्या भावाची काळजी घ्या, तो खूप धाडसी आहे... तुमची नक्कीच काळजी घेईल'', अशी भावनिक साद प्रियांका गांधी मतदारांना घातली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (4 एप्रिल)वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी यांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शनदेखील केलं. या रोड शोनंतर प्रियांका गांधी यांनी मतदारांसोबत संवाद साधत राहुल गांधी यांना विजयी करण्यासाठी भावनिक साद घातली.

    नेमकं काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

    प्रियांका गांधी यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटलं की, ''माझा भाऊ, माझा खरा मित्र आहे, तो खूपच धाडसी आहे. वायनाडकरांनो माझ्या भावाची काळजी घ्या. तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही''. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. वायनाडव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील अमेठीतूनदेखील राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत.

    स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा

    तर दुसरीकडे, स्मृती इराणींनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. ''राहुल गांधींनी आतापर्यंत कोणाला साथ दिली आहे?'', अशा शब्दांत स्मृती इराणींनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे.

    वाचा अन्य बातम्या

    VIDEO : अब्दुल सत्तारांचं नेमकं चाललंय तरी काय? दानवेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

    VIDEO: वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

    VIDEO: ...तर निवडणूक आयोगाला जेलमध्ये पाठवू - प्रकाश आंबेडकर

    VIDEO: अ‍ॅसिड हल्ल्याबाबत बोलताना जया प्रदा झाल्या भावुक

    First published:

    Tags: Priyanka gandhi, Rahul gandhi