जलपाईगुडी, 11 डिसेंबर: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिद सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. येथील मशिदीकडून एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित मशिदीनं नमाजसाठी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरचा वापर बंद केला आहे. तसेच मशिदीचा काही परिसर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खुला केला आहे. या परिसरात आता विद्यार्थी नमाज पठण करण्याऐवजी शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहे.
मशिद परिसरात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पीकरचा त्रास होऊ नये, म्हणून मुस्लीम समाजातील लोकांनी नमाजासाठी स्पीकर न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मशिदीने आपल्या मालकीची जागा मुलांचे वर्ग भरवण्यासाठी दिली आहे. मुस्लिम समाजातील लोकांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देत मुस्लीम समुदाने घेतलेला हा निर्णय प्रेरणादायी असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
WB | A mosque in Jalpaiguri isn't using loudspeakers for namaz to avoid disturbance in studies of students of a school, during COVID We're offering namaz without loudspeakers for noise-free classes on our premises. Can't develop the nation without education: Najimul Haque, Imam pic.twitter.com/wXJXrEwwPn
— ANI (@ANI) December 11, 2021
यासंदर्भात मशिदीचे इमाम नजीमुल हक यांनी सांगितलं सांगतात की, मशिदीमध्ये विद्यार्थी अभ्यास करत असताना, नमाज पठण करण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर केला जात नाही. मशिदीच्या आवारात अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. शिक्षणाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, असही संबंधित इमामने म्हटलं आहे.
हेही वाचा-Serum ने मागितलेली कोविशिल्डच्या बूस्टर डोससाठी परवानगी; वाचा सरकारचं उत्तर
मशिदीतील शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी सांगितलं की, मशिदीच्या संचालकांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे. येथील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. अशा स्थितीत राज्य सरकारने 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आम्ही याठिकाणी विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग भरवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, अशा विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: West bengal