VIDEO या मंत्र्यांना जरा आवारा! 'रोजगार आहेत, मात्र लोकच शिकलेले नाहीत'

VIDEO या मंत्र्यांना जरा आवारा! 'रोजगार आहेत, मात्र लोकच शिकलेले नाहीत'

गंगवार यांच्या या वक्तव्याने बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय. रोजगार देऊ नका, मात्र किमान बोलू तरी नका.

  • Share this:

नवी दिल्ली 15 सप्टेंबर : केंद्रीय रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार हे सध्या आपल्या एका वक्तव्याने चांगलेच अडचणीत आलेत. सोशल मीडियावर त्यांना लोकांनी प्रचंड ट्रोल केलंय. देशात मंदीसदृश्य वातावरण असताना आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर घटत आहेत हे आता उघड झालंय. असं असताना ज्यांच्या हातात देशातलं रोजगाराचं खातं आहे त्या मंत्र्यांनी अभ्यासपूर्ण बोलणं अपेक्षीत आहे. मात्र असं न करता गंगवार यांनी उरफाटी विधाने केलीत. ते म्हणाले, देशात रोजगाराच्या संधी आहेत. रोजगाराची काहीच कमतरता नाही, मात्र त्या पात्रतेचे लोकच शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाहीत. गंगवार यांच्या या वक्तव्याने बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय.

.तर खासदार सुजय विखेंच्या विरोधात तक्रार करणार ही सिनेअभिनेत्री

लोकसभा निवडणुकीच्या काळात देशातल्या रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याची आकडेवारी बाहेर आली होती. त्यानंतर आता मंदीमुळे अनेकांचे रोजगार जात असल्याचं दिसून येतंय. देशातल्या वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणावर रोजगार गेला आहे. जागतिक मंदी आणि सरकारच्या काही धोरणांमुळे देशात आर्थिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण नाही असं म्हटलं जातंय. देशांतर्गत बाजारपेठेत मालाला उठावच नसल्याने उद्योगधंदे मंदावले आहेत.

अशा परिस्थितीत रोजगार देणारे मंत्रीच असं विधान करत असतील तर कसं होणार असा प्रश्न आता विचारला जातोय. चौफेर टीका झाल्यावर गंगवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं ते म्हणाले. मला वेगळं सांगायचं होतं. ज्या स्किलची गरज आहे, त्या स्किलचं प्रशिक्षण दिलं पाहिजे तरच त्या शिक्षणाला अर्थ राहील असं मला म्हणायचं होतं असं त्यांनी स्पष्ट केलं.

युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयरीत?

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थव्यवस्थेला आलेल्या सुस्तीवर योजलेले उपाय सांगण्यासाठी कालट पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बऱ्याच घोषणा केल्या. त्यापैकी एक महत्त्वाची घोषणा केलीय. ती म्हणजे आता भारतात दुबईप्रमाणे दर वर्षी मेगा शाॅपिंग फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे. यात हिरे, दागिने, हस्तकला, योग, पर्यटन अशा थिम्स ठेवल्या जातील. अर्थमंत्री म्हणाल्या, मेगा फेस्टिवलच्या आयोजनामुळे टेक्सटाइल आणि चामड्याच्या उद्योगाला चालना मिळेल. सोबत योगा टुरिझमलाही प्रोत्साहन मिळेल. अर्थमंत्री म्हणाल्या की महागाई नियंत्रणात आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या किमती वाढल्यानं ऑगस्टमध्ये महागाई दर 3.21 टक्के झाला. जो जुलैमध्ये 3.15 टक्के होता. आरबीआयचं लक्ष्य महागाई 4 टक्क्यापर्यंत ठेवायचं आहे.

First published: September 15, 2019, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading