इंग्रजांच्या काळातील 220 धरणं धोकादायक अवस्थेत? तिवरेसारखी दुर्घटना घडण्याची भीती !

देशात 100 वर्षे झालेली 220 धरणं आहेत. त्यांच्या स्थितीवर आता चर्चा सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 03:48 PM IST

इंग्रजांच्या काळातील 220 धरणं धोकादायक अवस्थेत? तिवरेसारखी दुर्घटना घडण्याची भीती !

नवी दिल्ली, ओम प्रकाश, 07 जुलै : चिपळूणमधील तिवरे धरणं फुटलं आणि 19 जणांचा जीव गेला. त्यानंतर आता देशातील धरणांच्या स्थितीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. देशात इंग्रजांच्या काळातील 220 धरणं असून त्यांना 100 वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्यांची दुरूस्ती आणि त्याकडे लक्ष न दिल्यास मोठ्या दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता आहे. South Asia Network On Dams Rivers and people ( SANDRP )चे को-ऑर्डिनेटर हिमांशू ठक्कर यांनी सर्व धरणं धोकादायक स्थितीत आहेत असं नाही. पण, त्यांची देखभाल न केल्यास मोठा धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी तिवरे धरणाचं उदाहरण दिलं. कारण, 2004मध्ये या धरणाचं बांधकाम करण्यात आलं होतं. 2018मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरामागे देखील धरणांचा हातभार आहे. कारण, त्यांच्या पाण्याचं व्यवस्थापन नीटपणे करणं गरजेचं होतं.

प्रियंका गांधींवर देखील राजीनाम्याठी दबाव वाढला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण !

या राज्यांमध्ये सर्वाधिक धरणं

मध्य प्रदेशात 59, महाराष्ट्रात 41, गुजरातमध्ये 30, राजस्थानमध्ये 25, उत्तर प्रदेश आणि तेलंगनामध्ये प्रत्येकी 17, कर्नाटकमध्ये 15, छत्तीसगडमध्ये 6, आंध्र प्रदेशमध्ये 4, ओडिसामध्ये 3 आणि बिहार, केरळ, तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक- एक धरण आहे.

तिवरे धरण दुर्घटना; 5व्या दिवशी सर्च ऑपरेशन सुरू, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

Loading...

तिवरे धरणं फुटलं, 19 बळी

राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. याच मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण फुटून वाहून गेलेल्यांपैकी 19 मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. सरकारनं देखील आता चौकशीचे आदेश देत जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तिवरे दुर्घटनेनंतर आता राज्यातील धरणांच्या स्थितीवर चर्चा सुरू झाली आहे. तिवरे धरणाबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून देखील आता जोरदार टीका केली जात आहे.

VIDEO: 'त्या एका तक्रारीची दखल घेतली असती तर 24 जणांचे जीव वाचले असते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 03:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...