नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : कॅन्सर आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने खुशखबर दिली आहे. केंद्र सरकार देशभरात 1.5 लाख वेलनेस केंद्रं सुरू करण्याच्या विचारात (More than 1.5 Lakh wellness centers to be situated in the country says health minister) असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे. या प्रस्तावित दीड लाख केंद्रांपैकी 79 हजार (79 thousand centers already set) केंद्रांची अगोदरच उभारणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वत्र वेलनेस सेंटर्सची स्थापना केली जाणार आहे. यामुळे छोट्या रुग्णालयांमध्येदेखील नागरिकांना कॅन्सर आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर उपचार मिळणं शक्य होणार आहे.
इन्फ्रास्टक्चरवर सुरू आहे काम
देशभरात पायाभूत सुविधांवर काम सुरू असल्याची माहिती मंडाविया यांनी दिली आहे. इन्फ्रास्टक्चरवर प्रत्येक जिल्ह्यात 90 ते 100 कोटी रुपये खर्च करण्यात येत असून पुढील 4 ते 5 वर्षात हा खर्च करण्यात येणार आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.31 कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. सामान्य माणसाला परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी आरोग्य यंत्रणा देशभरात उभी करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याची माहिती आरोग्यमंत्री मंडाविया यांनी दिली आहे. हेल्थ इन्फ्रास्टक्चर मिशन अंतर्गत देशातील 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं राज्य स्तरावर कमीत कमी 15 हेल्थ इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
For treatment of diseases like cancer, diabetes and check-up at the primary level, we took a decision to set up 1,50,000 health and wellness centres out of which about 79,000 are already functional in the country: Union Minister @mansukhmandviya #HealthInfrastructureMission pic.twitter.com/wupEWYPcqv
— PIB India (@PIB_India) October 26, 2021
राष्ट्रीय महामार्गांवर हॉस्पिटलची स्थापना
राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक 2 कंटेनर हॉस्पिटलची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा इतर संकटाच्या वेळी वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी हायवेववच कंटेनर हॉस्पिटलची स्थापना केली जाणार आहे.
हे वाचा -Yucks! दंतमंजन घालून बनवली Toothpaste Coffee, VIDEO पाहून खवळले कॉफीप्रेमी
आरोग्य हीच संपत्ती
आरोग्यपूर्ण देश हाच संपन्न देश बनू शकतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री मंडाविया यांनी दिली आहे. छोट्या छोट्या गावांपासून महानगरांपर्यंत सर्व ठिकाणांचा समावेश करण्याची सरकारची योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.