गुजरातमध्ये हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतर; 863 जणांना हवाय धर्म बदलून

गुजरातमध्ये हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर धर्मांतर; 863 जणांना हवाय धर्म बदलून

Hindu Conversion In Gujarat : गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंनी धर्मांतरासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे.

  • Share this:

सुरत, 02 जुलै : देशात सध्या हिंदु, मुस्लीम यावरून वाद होत असताना आता गुजरातमध्ये हिंदुंनी धर्मांतराची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिली आहे. मंगळवारी ( आज ) विधानसभेत बोलत असताना विजय रूपाणी यांनी मागील दोन वर्षामध्ये 863 हिंदू आणि 35 मुस्लिमांनी राज्य सरकारकडे धर्मांतराची परवानगी मागितल्याची माहिती दिली. आतापर्यंत 689 जणांना राज्य सरकारनं परवानगी दिल्याची माहिती देखील यावेळी विजय रूपाणी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिलेली आकडेवारी ही 31 मार्च 2019 पर्यंतची आहे.

खून का बदला खून से; 29 वर्षानंतर वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

हिंदूंची संख्या सर्वाधिक

दरम्यान, 911 जणांनी धर्म बदलण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यामध्ये 863 हिंदू तर 35 मुस्लीम, 11 इसाई आणि 1 बौद्ध धर्मातील व्यक्तीचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या हिंदूंची आहे. धर्मांतरासाठी सुरतमधील 474, जूनागडमधील 152 आणि आणंदमधील 61 हिंदूंनी अर्ज केला आहे.

धर्म बदलण्यासाठी घ्यावी लागते परवानगी

धर्मांतरासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. जबरदस्तीनं होणार धर्मांतर टाळण्यासाठी 2008मध्ये हा कायदा लागू करण्यात आला आहे.

VIDEO गर्दीचा फायदा घेत खिसे कापणाऱ्या चोराला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चोपलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या