कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र

कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणी जगभरातल्या 600पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी मोदींना लिहलं खुलं पत्र

हे पत्रं भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन, जर्मनी, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात, आयर्लंड, कॅनडा आणि इतर काही देशांतील जवळपास 637 शिक्षणतज्ज्ञांनी स्वाक्षरीकृत केलं आहे.

  • Share this:

22 एप्रिल : भारत आणि परदेशांतील 600 पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर खुलं पत्र लिहिलं आहे. कठुआ आणि उन्नावमधील घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारं हे पत्रं असून, पाच दिवसांपूर्वी 49 माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना हे खुलं पत्र लिहिलं होतं.

शिक्षणतज्ज्ञांच्या या पत्रात, सत्ताधारी पक्षांचा हिंसाचारासाठी असलेला पाठिंबा नाकारला जाऊ शकत नाही, असं नमूद करण्यात आलं होतं. तसेच देशातील एवढ्या गंभीर विषयावर मोदींनी मौन धारण केल्याचाही आरोप शैक्षणिक संस्था आणि विद्वानांनी केला आहे. काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केल्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं आहे.

हे पत्रं भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन, जर्मनी, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात, आयर्लंड, कॅनडा आणि इतर काही देशांतील जवळपास 637 शिक्षणतज्ज्ञांनी स्वाक्षरीकृत केलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2018 09:23 AM IST

ताज्या बातम्या