माओवाद्यांना मोठा तडाखा, तब्बल 32 जणांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

माओवाद्यांना मोठा तडाखा, तब्बल 32 जणांनी केलं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दंडकारण्यासह देशातल्या 70 जिल्ह्यात माओवादी संघटनेच्या माध्यमातून हिंसक कारवाया केल्या जात आहेत. छत्तीसगढ पोलिसांनी जून महिन्यात मोस्ट वॉंटेड माओवाद्यांची यादी जाहीर केली होती.

  • Share this:

दंतेवाडा 25 ऑक्टोबर: पोलिसांवर हल्ले करणे आणि स्फोट घडवून आणणे असे गंभीर आरोप असलेल्या तब्बल 32 माओवाद्यांनी रविवारी छत्तिसगढमधल्या दंतेवाडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. एकाच वेळी 32 जणांनी चळवळ सोडण्याची घटना ही मावोवाद्यांना मोठा हादरा समजला जातो. यातल्या चार जणांवर 4 लाखाचं बक्षिस होतं अशी माहितीही दंतेवाड्याचे पोलीस एसपी अभिषेक पल्लव यांनी दिली आहे.

यात 10 महिला माओवाद्यांचा समावेश असून त्यांनी बरसूर पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं. पोलीसांनी माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी जी मोहिम राबवली होती त्याचा हा परिणाम असून या माओवाद्यांचा चळवळीतून भ्रमनिरास झाल्याचं पल्लव यांनी सांगितलं.

यातल्या माओवाद्यांवर पोलीस पथकांवर हल्ला करणे, निवडणुकीत अडथळा आणणे, अधिकाऱ्यांना धमकावणे, भूसुरूंगांचे स्फोट करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे पोलिसांनी त्यांची ओळख जाहीर केलेली नाही.

दंडकारण्यासह देशातल्या 70 जिल्ह्यात माओवादी संघटनेच्या माध्यमातून हिंसक कारवाया केल्या जात आहेत. छत्तीसगढ पोलिसांनी जून महिन्यात मोस्ट वॉंटेड माओवाद्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत माओवादी नेता मिलींद तेलतुंबडेसह माओवाद्याच्या संघटनेचा महासचिव नंबाला केशव, माजी महासचिव मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती तसेच दंडकारण्याची विशेष जबाबदारी असलेला भुपतीचा समावेश होता.या सगळ्यांवर सुमारे 12 कोटी रुपयांचं बक्षीस आहे.

दहनापूर्वीच रावण बेपत्ता, शोधाशोध करून नागरिक हैराण...पोलीसही निरुत्तर

नंबाला केशववर आणि गणपतीवर पाच राज्याच प्रत्येकी तीन कोटीपेक्षा जास्त बक्षीस आहे. माओवाद्याच्या केंद्रीय समितीच्या 14 सदस्यांची नावे या यादीत आहेत. मिलिंद तेलतुंबडेवर तीन राज्यात एक कोटीपेक्षा जास्तीचे बक्षीस आहे. या माओवाद्यांवर महाराष्ट्रात प्रत्येकी 50 लाखांपेक्षा जास्त बक्षीस आहे. या माओवाद्यांच्या अटकेसाठी सुरक्षा यंत्रणा आता नवी रणनीती तयार करत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 25, 2020, 6:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या