मराठी बातम्या /बातम्या /देश /COVID-19 in India: 24 तासात 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा पुन्हा 3000 पेक्षा जास्त

COVID-19 in India: 24 तासात 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा पुन्हा 3000 पेक्षा जास्त

 बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 29 एप्रिल : देशात कोरोना संसर्ग झपाट्याने (Corona in India) वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. देशातील जवळपास सर्वच राज्यांंमध्ये बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या भयानक स्थितीत लोकांना रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील झाले असून आणि रुग्णांचा उपचाराविना मृत्यू (Corona Death) होत आहे. बुधवारी देशात पुन्हा तब्बल 3 लाख 80 हजार रुग्णांची नोंद झाली तर 3,646 लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक ठरणारी एकमेव बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) वाढले असून गेल्या 24 तासात 2 लाख 70 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

भारतातील वेगाने वाढणार्‍या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघही () देशाच्या मदतीसाठी पुढे आला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले की, डब्ल्यूएचओ (WHO) आणि युनिसेफच्या (UNICEF) सहकार्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑक्सिजन उत्पादक वनस्पतींसह 7,000 ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स, 500 नोजल उपकरणे भारतात पाठविली जात आहेत. महाराष्ट्रातील भीषण कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना महाराष्ट्रासाठी मोबाइल हॉस्पिटल युनिट्स, लॅब आणि 2600 फील्ड अधिकारी पाठवत आहे.

हे वाचा - निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांनी जिवंत महिलेला केलं मृत घोषित, चितेवर ठेवल्यानंतरही चालू होता श्वास

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वाधिक ताण असलेली राज्ये आणि मोठ्या शहरांच्या प्रशासनाने ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांच्या मृत्यू होत असल्याचे वारंवार सांगितले होते. यावर कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्याकरिता अमेरिका व्यतिरिक्त जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससुद्धा ऑक्सिजनशी संबंधित उपकरणे भारतात पाठवत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेव्यतिरिक्त रशियाकडून मदतीची पहिली तुकडीही गुरुवारी भारतात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

दिल्लीत 25,986 नवीन बाधित

दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25,986 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता दिल्लीत सक्रिय संक्रमित रुग्णांची संख्या 99,752 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत 20, 458 लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या दिल्लीत 53,819 लोक घरात अलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत, तर गेल्या 24 तासांत दिल्लीत एकूण 81, 829 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, तर सध्या मृत्यूदर 1.39 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात 985 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचवेळी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण 'जैसे थे'च आहे. राज्यात बुधवारी 63 हजार 309 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. बुधवारी 61 हजार 181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 37 लाख 30 हजार 729 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  बुधवारी सर्वाधिक 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्य स्थितीत राज्यात एकूण 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत.

First published:

Tags: Corona patient, Corona updates, Corona virus in india, Coronavirus