गर्भपात करणाऱ्या डॉक्टरच्या घरात 2 हजार भ्रूणांचे अवशेष सापडल्यानं अमेरिकेत खळबळ

गर्भपात करणाऱ्या डॉक्टरच्या घरात 2 हजार भ्रूणांचे अवशेष सापडल्यानं अमेरिकेत खळबळ

अमेरिकेत एका डॉक्टरच्या मृत्यूनंतर तब्बल 2 हजार भ्रूणांचे अवशेष सापडले असून एकही गर्भपाताची शस्त्रक्रिया झाल्याचा पुरावा मात्र मिळाला नाही.

  • Share this:

जोलिएट, 15 सप्टेंबर : अमेरिकेतील इंडियानात एका गर्भपात क्लिनिकच्या एका डॉक्टरच्या घरी तब्बल 2 हजार भ्रूणांचे अवषेश सापडले आहेत. या भ्रूणांना सुरक्षित ठेवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात संबंधित डॉक्टरचे निधन झाले आहे. विल काउंटीच्या सेरिफ कार्यालयानं सांगितलं की, डॉक्टर उलरिच क्लोफर यांच्या वकिलानं घरी भ्रूणांचे अवशेष असण्याची शंका व्यक्त केली होती.

शेरिफ ऑफिसकडून सांगण्यात आलं की, ड़ॉक्टरांच्या घरातून तब्बल 2 हजार 246 भ्रूण ताब्यात घेण्यात आले. संरक्षित करण्यात आलेले भ्रूण होते. मात्र, घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेचे पुरावे मिलाले नाहीत. सर्व भ्रूण ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

क्लोफर यांचा मृत्यू 3 सप्टेंबरला झाला. ते साउथ बेंड, इंडियानात एका गर्भपात क्लिनिकमध्ये डॉक्टर होते. 2015 मध्ये त्याचं लायसन रद्द करण्यात आलं होतं. या क्लिनिकने नियमांचे पालन न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

साउथ बेंड ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार क्लोफर इंडियानात गर्भपातासाठी प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. इंडियाना राइट ऑफ लाइफचे अध्यक्ष माइक फिशर यांनी सांगितलं की, भ्रूण सापडल्यानंत आम्हाला धक्का बसला आहे. इंडियानातील अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आलं आहे. तिथल्या गर्भपातांच्या प्रकरणांशी या अवशेषांचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे.

काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO

First published: September 15, 2019, 3:50 PM IST
Tags: america

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading