केंद्र सरकारकडून 11.44 लाख पॅन कार्ड रद्द!

केंद्र सरकारकडून 11.44 लाख पॅन कार्ड रद्द!

एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

  • Share this:

3 ऑगस्ट : 11.44 लाख पॅन कार्ड रद्द किंवा निष्क्रिय केल्याची माहिती केंद्र सरकारनं संसदेत दिली आहे. एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करणाऱ्या  कर चुकवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने  हे  पाऊलं उचललं आहे. राज्यसभेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी ही माहिती दिली.

27 जुलै 2017 पर्यंत 11 लाख 44 हजार 211 पॅन कार्ड रद्द अथवा निष्क्रिय करण्यात आले आहेत. एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ‘एक व्यक्ती एक पॅन’ असा नियम असून, 27 जुलैपर्यंत 1566 पॅन कार्ड हे बनावट पॅन कार्ड असल्याचं उघड झालं आहे.

31 ऑगस्टपर्यंत आधारशी पॅनकार्ड संलग्न करण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलं नाही तर पॅन कार्ड रद्द केलं जाईल. तसंच  2016-17 या वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदतही 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 06:06 PM IST

ताज्या बातम्या