मराठी बातम्या /बातम्या /देश /

आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार, रेल्वे व्यवस्था खिळखिळी, 100 ट्रेन रद्द, 33 जणांचा बळी

आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार, रेल्वे व्यवस्था खिळखिळी, 100 ट्रेन रद्द, 33 जणांचा बळी

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. राज्यातील चित्तूर, कडप्पा, अनंतपूर आणि नेल्लूर येथे पूरसदृश्य परिस्थिती आहे. तसेच पेन्ना नदीला पूर (Flood) आल्याने शेकडो वाहनं पाण्यात गेले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

विशाखापट्टणम, 22 नोव्हेंबर : आंध्र प्रदेशमध्ये (Andra Pradesh) मुसळधार पावसाने (Heavy Rain) प्रचंड थैमान घातलं आहे. पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तसेच 12 जण बेपत्ता आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Bay of Bengal) आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. या पावसामुळे राज्याची रेल्वे व्यवस्था देखील खिळखीळी झाली आहे. रेल्वे व्यवस्थेला पावसाचा मोठा फटका बसला आहे. नेल्लोरजवळ (Nellore) पादुगुपाडू येथे रेल्वे ट्रॅकचं नुकसान झाल्याने 100 पेक्षा जास्त एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) दिली आहे. तसेच पावसामुळे 29 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

नद्या-नाले तुडुंब, आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा कहर

आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. राज्यातील चित्तूर, कडप्पा, अनंतपूर आणि नेल्लूर येथे पूरसदृश्य परिस्थिती आहे. तसेच पेन्ना नदीला पूर आल्याने शेकडो वाहनं पाण्यात गेले आहेत. अनेक प्रवासी या पुरामुळे ठिकठिकाणी अडकले आहेत. काही महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे. रेल्वे मार्गाबरोबर बस सेवेवरही त्याचा प्रभाव पडला आहे. अनेक प्रवासी नेल्लोर आरटीसी बस स्थानकावर अडकले आहेत.

हेही वाचा : प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित

शेती नष्ट, घरांची पडझड, पावसामुळे सारं उद्ध्वस्त

प्रशासनात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कडप्पा येथे 20, अनंतपूरमध्ये 7, चित्तूरमध्ये 4 आणि एसपीएस नेल्लोकमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. नेल्लोर येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हा सोमसिला जलाशयाजवळ आढळला आहे. तर कडप्पा जिल्ह्यात 12 जणांच्या बेपत्ता झाल्याची माहिती आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक घरांचीदेखील पडझड झालीय.

तिरुपती शहरात प्रचंड नुकसान

आंध्र प्रदेशच्या तिरुपती शहरात पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. सुरक्षेच्या पार्भूमीवर शहरात एनडीआरएफच्या 10 व्या बटालियनने राजमपेट आणि तिरुपती येथे प्रत्येकी दोन पथकं तैनात केले आहेत. नेल्लोर जिल्ह्यात तीन पथकं दाखल आहेत. तर एनडीआरएफची तिसरी बटालियन बिशाखापट्टणम येथे दाखल होतेय.

हेही वाचा : भाजप-टीएमसी यांच्यात पुन्हा टोकाचा संघर्ष, घडामोडींना वेग

पावसामुळे सर्वच मार्गांचा नुकसान

मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशमध्ये चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग - 16, नेल्लोर आणि विजयवाडा दरम्यानचा रस्ता बंद झाला आहे. चेन्नई ग्रँड ट्रंक रेल्वे मार्गही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे देशाला दक्षिण-उत्तर आणि पूर्वेला जोडणारा रेल्वे मार्ग देखील बंद झाला आहे. पुरामुळे रेल्वे ट्रॅक, रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालंय. तसेच पावासाचा हवाई वाहतुकीवरही फटका बसला आहे. पावसामुळे कडप्पा विमानतळ 25 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First published: