नवी दिल्ली 16 ऑक्टोबर: चीन बरोबर तणाव असताना (Border Dispute With China) भारतीय हवाई दलाची (Indian Air force) क्षमता आणखी वाढणार आहे. अत्याधुनिक राफेल विमानांचा (Rafale Fighter Jet) दुसरा ताफा लवकरच हवाई दलात दाखल होणार आहे. ही विमाने आणण्यासाठी हवाईदलाची टीम फ्रान्समध्ये दाखल झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ही विमाने भारतात येणार आहेत.
ही विमाने आणण्यासाठी हवाई दलाचं एक पथक फ्रान्सला गेलं आहे. सगळ्या तपासण्या पूर्ण करून ही विमान भारतात आणली जाणार आहे. ही विमाने आल्यानंतर भारतातल्या राफेल विमानांची 9 पर्यंत जाणार आहे. सध्या जगात अत्याधुनिक समजली जातात.
चीनसोबत सुरू असलेला सीमा वाद आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर ही विमाने भारतात आल्याचा त्याचा लष्कराला मोठा फायदा होणार आहे.
या आधी 3 लढाऊ तर दोन प्रशिक्षित अशा 5 राफेल विमानांची पहिली तुकडी 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर पोहोचली होती.
ही बहुप्रतिक्षित लढाऊ विमाने येत असताना आकाशातच हा थरार सोहळा रंगला होता. पाच राफेल फायटर विमानानं भारताच्या दिशेनं येत होती तेव्हा दोन सुखोई विमानांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर ही विमानं अबाला एअरबेसवर पोहोचली.
'पाकिस्तानमध्ये येऊन क्रिकेट खेळा', PCB ने या देशाला दिलं निमंत्रण
यूएईच्या अल दरफा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौकेतील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर या युद्धनौकेनंही राफेल विमानाचं स्वागत केलं होतं.
सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील.
हवेतूनच जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत अचूक निशाणा साधणार्या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.