तरुणांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या आलिशाला पश्चाताप, मागितली सगळ्यांची माफी

तरुणांना गळाभेट करून ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या आलिशाला पश्चाताप, मागितली सगळ्यांची माफी

मुरादाबादच्या मॉलबाहेर ईदच्या दिवशी तरुणीने अनेक तरुणांना गळाभेट करतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. त्या व्हिडिओमधल्या तरूणीने आता सगळ्यांची माफी मागितली आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 23 जून : मुरादाबादच्या मॉलबाहेर ईदच्या दिवशी तरुणीने अनेक तरुणांना गळाभेट करतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. त्या व्हिडिओमधल्या तरूणीने आता सगळ्यांची माफी मागितली आहे. आलिशा मलिक असं या तरुणीचं नाव आहे.

आलिशाची गळभेट घेण्यासाठी चक्क तरुणांच्या रांगा लागल्या होत्या. पण आता या संपूर्ण प्रकाराबद्दल अलिशा मलिकला माफी मागावी लागली आहे. मुस्लीम धर्मगुरूंनी आक्षेप घेतल्यानंतर अलिशाने हे स्पष्टीकरण दिलं आहे.

VIDEO : ईद मुबारक हो!,तरूणीची गळाभेट घेण्यासाठी तरुणांची लागली रांग

याबरोबरच ज्या लोकांनी व्हायरल व्हिडिओवर आक्षेप घेत हे इस्लामविरोधी असल्याच्या भावना व्यक्त केल्या त्या सर्वांची अलिशाने माफी मागितली आहे. आलिशा मलिकच्या म्हणण्यानुसार या प्रकारानंतर तिचं घरातून बाहेर निघणंही कठिण झालं होतं.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांच्या समस्या वाढल्या. गेल्या आठवड्यातच अलिशाचा तरूणांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

देवबंदी उलेमा यांनीसुध्दा याला गैर-इस्लामी ठरवलं आहे. उलेमा मौलाना अब्दुल लतीफ कासीम म्हणाले की, 'इस्लाममध्ये याची परवानगी नाही. पण कोणत्याही धर्माला मानणारा व्यक्ती आपल्या आई-बहिणीला असं इतरांशी गळाभेट करण्याची परवाणगी देणार.' त्यामुळे आलिशाच्या या प्रकारामुळे मुस्लीम धर्मीयांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

पण सर्व स्तरातून आपल्याला विरोध होत असल्याचं लक्षात घेत आलिशाने शुक्रवारी सगळ्यांची माफी मागितली. यात माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. जून्या रुढी-परंपरा बदलण्यासाठीच मी हे केलं असं स्पष्टीकरणही आलिशाने दिलं आहे.

हेही वाचा...

व्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय !

दहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली

न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 01:41 PM IST

ताज्या बातम्या