चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर मागितली होती इंदिरा गांधींची माफी!

चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर मागितली होती इंदिरा गांधींची माफी!

चंद्रमोहिमेला गुरुवारी 50 वर्ष झालं. 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जुलै : अमेरिकेच्या Apollo मोहिमेला गुरुवारी 50 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्च इंजिन गुगलने अनोखं डुडल तयार केलं आहे. यामध्ये अमेरिकेच्या पहिल्या चंद्रावरील मोहिमेची संपूर्ण स्टोरीच सांगण्यात आली आहे. अमेरिकेने 16 जुलै 1969 रोजी अपोलो यान चंद्रावर पाठवले होते. अपोलो 11 या यानातून प्रथमच दोन अंतराळवीर चंद्रावर उतरले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर परतले होते. या मोहिमेद्वारे मानवाने प्रथमच चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवले होते.

16 जुलै 1969 रोजी कॅनडी स्पेस सेंटर येथून सकाळी 8.32 मिनिटांनी अपोलो यान चंद्राकडे झेपावले होते. अपोलो 11मध्ये 3 अंतराळवीर होते. यात मिशन कमांडर नील आर्मस्ट्रॉग, कमांडर मॉड्यूल पायलट मायकल कोलिन्स आणि लूनर मॉड्यूल पायलट एडविन ई.एल्डिन ज्यूनिअर यांचा समावेश होता.

चंद्रावर पहिलं पाउल नील आर्मस्ट्राँगने 20 जुलैरोजी ठेवलं. चंद्र मोहिमेवरून परत आल्यानंतर आर्मस्ट्राँगने जगभर प्रवास केला होता. त्यावेळी दिल्लीत इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती. या भेटीवेळी नटवर सिंग उपस्थित होते. तेव्हा नटवर सिंग यांनी नील आर्मस्ट्राँगला सांगितलं की, चंद्रावर पहिलं पाऊल टाकत असलेला क्षण पाहण्यासाठी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी 4.30 वाजेपर्यंत जाग्या राहिल्या होत्या. नील आर्मस्ट्राँगला सांगण्यात आलं तेव्हा यासाठी त्यानं दिलगिरी व्यक्त केली होती.

इंटरनेटवर तुम्ही काय करता? पाहा एका मिनिटात काय होतं; वाचून थक्क व्हाल!

आंतराळात मानवाची ही कामगिरी अद्भुत अशीच होती. 20 जुलै 1969 हा दिवस नेहमीच आठवला जाईल. त्याच दिवशी मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं. नील आर्मस्ट्राँग यांचं वयाच्या 82 व्या वर्षी 25 ऑगस्ट 2012 ला निधन झालं.

ICC च्या एका निर्णयानं 30 खेळाडूंचं करिअर उद्ध्वस्त!

VIDEO: पहिलंच धरणं आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

First published: July 19, 2019, 2:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading