येरे येरे पावसा ... मान्सून या तारखेला धडकणार केरळ आणि गोव्यामध्ये

येरे येरे पावसा ... मान्सून या तारखेला धडकणार केरळ आणि गोव्यामध्ये

पुढच्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये धडकणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून जोराने पुढे सरकतो आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जून : उन्हाची तलखी अजूनही तीव्र असल्यामुळे सगळेच जण पावसाची वाट बघत आहेत. पुढच्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये धडकणार आहे, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून दक्षिणेकडे येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून जोराने पुढे सरकतो आहे.

हीच स्थिती कायम राहिली तर केरळच्या समुद्रकिनाऱ्यावर मुसळधार पाऊस येऊ शकतो. त्याचवेळी गोव्यामध्ये 12 जूनला मान्सून धडक देईल. आंध्र प्रदेशच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.

6 दिवस उशिरा

यावर्षी मान्सून सहा दिवसांनी उशिरा येणार आहे. खरंतर केरळमध्ये 1 जूनच्या आसपास पाऊस सुरू होतो पण यावेळी मात्र दक्षिणेकडच्या या पावसाच्या राज्यात मान्सूनची चिन्हं नाहीत.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. उन्हाची तलखी जाणवतेय. त्यातच धरणांचा पाणीसाठा आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे. अशा स्थितीत सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.

ईशान्येकडच्या राज्यात नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.

उन्हाची तलखी थोडी कमी

मान्सूनचं आगमन जवळ आल्यामुळे देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेतून काहिसा दिलासा मिळेल. उत्तर भारतातल्या राज्यांमध्येही आता उन्हाच्या झळा काहिशा कमी झाल्या आहेत.

यावर्षी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्याच नाहीत. त्यामुळे हा काळही पूर्णपणे शुष्क गेला. गेल्या 65 वर्षांत पहिल्यांदा मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण यावेळी अत्यल्प होतं.

भारताचा अर्थमंत्री

मान्सून हा भारताचा अर्थमंत्री आहे, असं म्हणतात. यावेळी पावसाने आणखीही काही दिवस ओढ दिली तर त्याचा पेरणीवर विपरित परिणाम होऊ शकतो. पाऊस चांगला पडला तर ग्रामीण भागात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. त्यावर आधारित उद्योगांनाही चांगले दिवस येतात. पण पावसाची अवकृपा झाली तर मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेलाच झळ बसते.

=======================================================================================

VIDEO: नागपुरात उष्माघाताने 4 जणांचा मृत्यू, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 4, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading