पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये; या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये; या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Monsoon in India : पुढील 24 तासामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 जून : मान्सूनची आतुरनेनं वाट पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण, पुढील 24 तासामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. तर,  नागालँड, छत्तीसगड, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालय आणि केरळमध्ये पुढील 72 तासामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचवेळी उत्तर भारतातील भागाला गर्मीपासून थोडासा दिलासा मिळणार असल्याचा अंदाज देखील यावेळी हवामान विभागानं वर्तवला आहे. झारखंड आणि बिहारमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी दिल्लीत 1 जुलै रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क; न्यायालयाचा निर्णय

अल् निनोचं संकट

मान्सूनवर अल् निनोचं सावट असण्याची शक्यता स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या आठवड्यापासून मान्सूनच्या प्रवासात पुन्हा अल् निनोचा अडथळा येण्याची भीती स्कायमेटनं व्यक्त केली आहे. हिंदी महासागरातून भारताच्या दिशेनं येणाऱ्या मान्सून प्रवासात अल् निनोमुळं अडथळे येऊन मान्सूनचा प्रवास बाधित होऊ शकतो. त्यामुळं मान्सून जरी भारतात पोहोचला तरी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मान्सूनचं आगमन लांबलं असलं तरी आता राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनची आगेकूच सुरू असून पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात धुवांधार बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)जारी केलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार देशात काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक ठिकाणी वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 03:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading