वायू चक्रीवादळाचा तडाखा; मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी 7 दिवस वाट पाहावी लागणार

वायू चक्रीवादळाचा तडाखा; मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी 7 दिवस वाट पाहावी लागणार

मुंबईकरांना आणखी 7 दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जून : वायू चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला नसला तरी वायू चक्रीवादळाचा परिणाम हा मान्सूनवर झाला आहे. कारण, मुंबईकरांना आणखी 7 दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. हवामान खात्यानं त्याबाबतची माहिती दिली आहे. गुरूवारी मुंबईला चक्रीवादळाचा धोका असल्याची माहिती देण्यात आली होती. पण, हा धोका टळला होता. महाराष्ट्र, गुजरातसह किनारी राज्यांना याबाबत सतर्क करण्यात आलं होतं. वायूमुळे गुजरातमध्ये 6 जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. मुंबईला असलेला धोका टळला असला तरी मान्सूनच्या प्रगतीवर मात्र त्याचा परिणाम झाला आहे.

बिहारमध्ये चमकी तापामुळे 60 मुलांचा मृत्यू

मान्सून केरळमध्ये

आठवड्याभरापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याची राज्याला आता प्रतिक्षा लागून राहिली आहे. 13 ते 14 जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे मात्र मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला असून मुंबईकरांना आणखी आठवडाभर वाट पाहवी लागणार आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. शिवाय, उकाड्यानं देखील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

राज्यातल्या काही भागात पावसाची हजेरी

संपूर्ण राज्यात मान्सून अद्याप तरी सक्रिय झालेला नाही. पण, मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक या भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज ठाकरेंचा 51वा वाढदिवस, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

First published: June 14, 2019, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading