Weather Forecast : राजधानीत पाऱ्याचा ऐतिहासिक कहर; तर या राज्यांत होणार मुसळधार पाऊस

Weather Forecast : राजधानीत पाऱ्याचा ऐतिहासिक कहर; तर या राज्यांत होणार मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे रायगडसह कोकण आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असताना तिकडे राजस्थान कडक उन्हाने तापलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जून : एकीकडे देशात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत उन्हाच्या गरम जळ्यांपासून नागरिकांना दिलासा दिला तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत उन्हाच्या तडाख्याने सगळे रेकॉर्ड तोडले. दिल्लीच्या पालममध्ये सोमवारी सगळ्यात जास्त म्हणजे 48 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच तापमानात एवढी वाढ झाली आहे.

याआधी 9 जून 2014 ला पालममध्ये 47.8 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर सफदरजंगमध्ये 45.6 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी दिल्लीत मात्र नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे.

राजस्थानच्या धौलपूरमध्ये 51 डिग्री तापमानाची नोंद

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे रायगडसह कोकण आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असताना तिकडे राजस्थान कडक उन्हाने तापलं आहे. राजस्थानमध्ये भीषण गरमीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राजस्थानमध्ये 51 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एवढ्या भीषण उन्हात घराबाहेर पडू नका असा इशार देण्यात आला आहे.

चुरूमध्ये उन्हाचा पारा 50च्या वर

राजस्थानच्या धौलपूर नाहीच तर चुरू जिल्ह्यातदेखील तापमान 50च्या वर गेलं आहे. 50.3 डिग्री तापमानाची नोंद चुरूमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे गरमीने नागरिकांचे हाल होत आहेत.

पुढच्या 48 तासांत मुसळधार पावसामुळे 'या' गावांना धोका

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 48 तासात रायगड, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्हा प्रशासन व आपत्ती प्रशासनाने किनारपट्टीच्या गावांना आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मच्छीमारी नौकानांही समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे.

हेही वाचा : प्रेमासाठी कायपण...वेश्येला जाळलं, पतीला जेलमध्ये जावं लागलं!

अरबी समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीवरील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दबावाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारांना पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनला अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल पडलेला पाऊस हा वळवाचा पाऊस होता. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे.

'वायू' असं या चक्रीवादळाचं नाव आहे. या वादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोणताही धोका नसला तरी त्यामुळे कोकणात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवस समुद्रात मासेमारांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अवकाळी आलेल्या पावसाने शेतीचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. तर जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मराठवाड्यात गारांचा पाऊस, या तारखेला येणार मान्सून

रणरणत्या उन्हात अचानक भरून आलेले ढग, सोसाट्याचा वारा आणि त्यापाठोपाठ झालेल्या गारांच्या पावसाने औरंगाबादकरांना थोडसं सुखावलं. ग्रामीण भागात या अवकाळी पावसाने नुकसान व्हायची शक्यता असली, तरी शहरात मात्र मुसळधार पाऊस आणि सोबत गारा पडल्याने नागरिकांना अंगाची लाही करणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : औरंगाबादेत बारचालकाची ग्राहकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने पुढचे दोन दिवस राज्यावर त्याचा परिणाम याच स्वरूपात दिसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. मान्सूनचं केरळात आगमन झाल्यानंतर राज्यात बहुतेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.

दुपारपर्यंत रणरणतं ऊन आणि दुपारनंतर ढग आणि सोसाट्याचा वारा असं वातावरण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होतं. पुढचे दोन दिवस हवामान असंच राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 15 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्याचा जोर इतका जोरात होता की जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजस्थंब खाली कोसळला. ध्वजस्थंभ कोसळताना जवळच असलेले अय्युब खान या नागरिकाने तिरंगा जमिनीवर पडू नये यासाठी नागरिकांना एकत्र करून स्थंब हातात पकडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नंतर ध्वज काढला. त्यांनतर स्थंभ बाजूला काढण्यात आला.

SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?

First published: June 10, 2019, 8:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading