आला रे आला...मान्सून केरळमध्ये दाखल !

आला रे आला...मान्सून केरळमध्ये दाखल !

monsoon in kerala : मान्सूनचं केरळमध्ये आगमन. पुढील आठवड्यात राज्यात होणार दाखल.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 जून : सर्वांसाठी खुशखबर! कारण, आतुरतेनं वाट पाहत असलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागानं याची घोषणा केली आहे. हळूहळू हा मान्सून पुढे सरकेल अशी माहिती देखील यावेळी हवामान विभागानं दिली आहे. 10 जूनला मान्सून दाखल होईल असा अंदाज होता. पण, दोन दिवस अगोदरच मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागत आहे. पण, आता केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानं आता दिलासा मिळाला आहे. पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज यावेळी हवामान तज्ञ्ज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, कोकणात देखील मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून दाखल होईल अशी माहिती साबळे यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली. सकाळी वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं घरावरचं छप्पर देखील उडालं.

राज्यात भीषण दुष्काळ

राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. गेल्यावर्षी पावसानं ओढ दिल्यानं पिकांचं देखील नुकसान झालं. सध्या सारी मदार ही टँकरवर आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. पाण्यासाठी वणवण वाढली आहे. लोकांनी गाव सोडून शहरांकडे धाव घेतली आहे. जनावरं देखील चारा छावण्यामध्ये बांधण्याची वेळ आली आहे. शिवाय, दावणीची जनावरं खाटीकाला देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. या साऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी समाधानकारक पाऊस हवा. त्यामुळे यंदा बळीराजाची सारी मदार ही वरूण राजावर आहे. सर्वाचे डोळे हे मान्सूनकडे लागले आहेत.

मान्सून पूर्व पावसाचं थैमान, अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हिरावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading