या मान्सूनमध्ये जेवढा पाऊस येणार तेवढाच फायदा होणार, असा येईल पैसा

या मान्सूनमध्ये जेवढा पाऊस येणार तेवढाच फायदा होणार, असा येईल पैसा

तज्ज्ञांच्या मतानुसार, सामान्य मान्सूनमुळे मोठे फायदे होणार आहेत. यामुळे शेतीला पुरक पाणी मिळेल. तर कंपनींना स्वस्तात माल उपलब्ध होईल. त्यामुळे फायद्यातही वाढ होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : भारतीय हवामान खात्याने (IMD)दिलेल्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून चांगला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यंदा जूनपासून सप्टेंबरपर्यंत मान्सून सामान्य असेल. यावर्षी जर चांगला पाऊस झाला तर त्याचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर अनेक कंपन्या आणि इंडस्ट्रीला त्याचा फायदा होणार आहे.

चांगला पाऊस हा सामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या उत्तम राहिल. तज्ज्ञांच्या मतानुसार, सामान्य मान्सूनमुळे मोठे फायदे होणार आहेत. यामुळे शेतीला पुरक पाणी मिळेल. तर कंपनींना स्वस्तात माल उपलब्ध होईल. त्यामुळे फायद्यातही वाढ होईल.

चांगल्या शेतीमुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्ता मजबूत होईल. त्यामुळे शेतमालाची मागणी वाढेल. त्याचा फायदा इंडस्ट्रीमधील अनेक कंपन्यांना होईल. एसकोर्ट सिक्योरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांच्या सांगण्यानुसार, वीज, फर्टिलायझर, पेस्टिसाईड आणि शेतीची उपकरणं तयार करणाऱ्या कंपन्यांनाही मोठा फायदा होईल.

कंज्यूमर डुरेबल्स सेक्टर आणि एफएमसीजी सेक्टरशी निगडीत कंपन्यांनाही याचा फायदा होईल. फायदा वाढल्यामुळे त्यांचे शेअर्सही वाढतील. फर्टिलायझर, एग्रो प्रोडक्ट, एफएमसीजी, वीज, केमिकल, बँकिंग कंपन्यांना मान्सूनचा जास्त फायदा होईल असं कॅपिटल सिंडिकेटचे मॅनेजिंग पार्टनर सुब्रमण्यम पशुपति यांचं म्हणणं आहे.

- फर्टिलायझर कंपनी यूपीएल (United Phosphorus Ltd)मध्ये खरेदी करू शकतात. त्याचं लक्ष्य 1180 रुपये प्रति शेअर आहे.

- एफएमसीजी सेक्टरमध्ये डाबर इंडियामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. ज्याचं लक्ष 450 रुपयांपर्यंत जाऊ शकतं.

हेही वाचा : पुढच्या 3 दिवसांत मान्सून येणार, हवामान खात्याने दिली माहिती

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8.शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.

ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण

First published: May 15, 2019, 7:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading