News18 Lokmat

पुढचे 2 दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी

पुढच्या काही दिवसांत 6 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या सगळ्या राज्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 06:50 PM IST

पुढचे 2 दिवस या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, रेड अलर्ट जारी

मुंबई, 10 जुलै : पुढच्या काही दिवसांत 6 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या सगळ्या राज्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याठिकाणी होणार मुसळधार पाऊस

10 जुलै : मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, चंदिगड, काश्मीर या राज्यांतही चांगला पाऊस होईल. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी याही राज्यांत चांगला पाऊस होईल.

11 जुलै : कोकण, गोवा, पश्चिम बंगाल, दक्षिण कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राज्यांत जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

स्पाइसजेटच्या तंत्रज्ञाचा मृत्यू, या एअरपोर्टवर घडली दुर्घटना

Loading...

12 जुलै : उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांतही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. जोरदार पावसामुळे आसाममध्ये पूर आला आहे.

यावर्षी संपूर्ण देशातच मॉन्सून उशिरा आला. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली. आता जुलै महिन्यात पाऊस हा अवशेष भरून काढेल, अशी शक्यता आहे. शेती आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा मोठा दिलासा आहे. जून महिन्यात राज्यांतल्या काही धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा होता. पण आता जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

================================================================================

VIDEO: नागपूर-जबलपूर महामार्ग ठरतोय वन्य प्राण्यांसाठी जीवघेणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: monsoon
First Published: Jul 10, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...